आई ICU मध्ये असल्याचं कळताच अक्षय कुमारनं गाठली मुंबई

चित्रीकरण अर्ध्यावर सोडत तडक मायदेश गाठला. 

Updated: Sep 6, 2021, 06:47 PM IST
आई ICU मध्ये असल्याचं कळताच अक्षय कुमारनं गाठली मुंबई  title=
अक्षय कुमार

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार  (Akshay Kumar) याची आई, अरुणा भाटिया यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळं खिलाडी कुमारच्या कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच अक्षय कुमारनं सर्व कामं, चित्रीकरण अर्ध्यावर सोडत तडक मायदेश गाठला. 

सूत्रांच्या माहितीनुसार अक्षयच्या आगामी 'सिन्ड्रेला' (Cinderella) या चित्रपटाचं चित्रीकरण युकेमध्ये सुरु होतं. पण, कुटुंबात आलेलं हे संकट त्याच्यापर्यंत पोहोचताच मागचापुढचा विचार न करता त्यानं भारतात परतण्याला प्राधान्य दिलं. 

चित्रपटाचे निर्माचे वासू भगानानी यांच्याशी बोलून त्यांना परिस्थिती सांगून त्यानंतरच तो युकेहून भारताच्या दिशेनं निघाला असं म्हटलं जात आहे. खिलाडी कुमारच्या आईला हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अद्यापही त्यांना कोणत्या कारणामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ते मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 

दरम्यान, अक्षय भारतात तातडीनं आल्यानंतर तो येण्यामागचं कारण चाहत्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर लगेचच सर्वांनी त्याच्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी प्रार्थना सुरु केल्या.