मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान, याची मुलगी आयरा हिसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. खासगी जीवनातील निर्णय आणि त्यापलीकडेही आयरानं स्वत:ची केलेली ओळख पाहता, ती कायमच सर्वांच्या नजरा वळवते.
फिटनेस एक्सपर्ट नुपूर शिखरे असो किंवा मग आमिरच्या खासगी आयुष्यातील त्यानं घेतलेला एखादा निर्णय.
आयराचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच तिच्या प्रगल्भतेची जाणीव करुन देतो.
आता म्हणे आमिरच्या या मुलीनं एक नवा टॅट्टू काढून घेतला आहे. आयरानं सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये तिचा हात दिसत आहे. ज्यावर चंद्र, सूर्य आणि एक तारा यांचा टॅट्टू काढण्यात आला आहे.
टॅट्टूचा अर्थ काय?
आयरानं काढलेल्या या टॅट्टूचा अर्थ काय, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर त्याचं उत्तर फार रंजक आहे.
ही संकल्पना मुळात एका कुटुंबाशी संलग्न आहे. ज्यामध्ये चंद्र स्त्रीचं प्रतिनिधीत्वं करतो. सूर्य पुरुषाचं आणि ताऱ्यांना मुलाबाळांच्या रुपात पाहिलं जातं.
काहीजण या तिन्ही तत्वांच्या मिश्रणाकडे मनमिळाऊ आणि जादुई ढंगानं पाहतात.
आयरानं हा टॅट्टू नेमका कोणासाठी काढलाय हे जाणून घेणं औत्सुक्याचं असेल. कारण, अनेकदा टॅट्टू काढण्यामागेही कैक कारणं आणि काही प्रोत्साहनपर कहाण्या असतात. आयराची यामागील कहाणी काय, हे ती सांगते का त्याकडेच आता सर्वांचं लक्ष.