VIDEO : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या सेलिब्रिटींचे हास्यविनोद व्हायरल

नेटकऱ्यांच्या उपरोधिक प्रतिक्रियांना उधाण 

Updated: Oct 3, 2018, 06:48 PM IST
VIDEO : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या सेलिब्रिटींचे हास्यविनोद व्हायरल   title=

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीत शो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांच्या पत्नीचं नुकत मुंबईत निधन झालं. बॉलिवूडमध्ये फर्स्ट लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा राज कपूर यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं. तर काही सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यदर्शनासाठीही पोहोचले. 

अनिल कपूर, बोनी कपूर, आलिया भट्ट, आयान मुखर्जी, राणी मुखर्जी, करण जोहर आणि अशा बऱ्याच जणांनी कपूर कुटुंबाला या दु:खाच्या प्रसंगात साथ दिल्याचं पाहायला मिळालं. 

पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून मात्र परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचं कळत आहे. 

अतिशय गंभीर अशा या प्रसंगात करण जोहर, राणी मुखर्जी, आयान मुखर्जी हे गप्पांमध्ये रंगल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुख्य म्हणजे ते फक्त गप्पांमध्ये रंगले नसून त्यांचे हास्विनोदही सुरु असल्याचं स्पष्टपणे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरंच ही किती वाईट परिस्थिती आहे, अशाच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. 

या सेलिब्रिटींनी संस्कारावर कोणी टीका केली आहे तर तुम्ही तिथे अंत्यदर्शनासाठी गेला होतात ना, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.