अभिनयासोबतच 'या' समाजकार्यासाठी नावाजली जातेय प्रियांका

 सामाजिक कार्यासाठी प्रियंकाचा सन्मान...

Updated: Dec 5, 2019, 07:04 PM IST
अभिनयासोबतच 'या' समाजकार्यासाठी नावाजली जातेय प्रियांका title=
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : बॉलिवूड ते हॉलिवूडची सुपरस्टार बनलेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनसने पुन्हा एकदा देशाचा मान वाढवला आहे. जागतिक स्तरावर प्रियांकाने पुन्हा एकदा आणखी एक सन्मान मिळवला आहे. प्रियांकाला तिच्या सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं आहे. 

युनिसेफच्या बालहक्कांसाठी सदिच्छा दूत म्हणून परोपकारी कार्यासाठी डॅनी के.ए. मानवतावादी पुरस्काराने प्रियांकाला सन्मानित करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये बुधवारी १५व्या वार्षिक यूनिसेफ स्नोफ्लेक बॉल कार्यक्रमात तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रियांकाने याबाबतचा व्हिडिओ, फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

  

प्रियांकाच्या या यशामुळे, तिला मिळालेल्या सन्मानाने प्रियांकाच्या पतीने निक जोनासनेही आपल्या प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.