Soldier 2 : 'सोल्जर 2' म्ध्ये बॉबी देओल-प्रीती झिंटा एकत्र दिसणार? निर्माते काय म्हणाले?

तब्बल 26 वर्षांनंतर बॉबी देओल आणि प्रीती झिंटाचा 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'सोल्जर' या हिट सिनेमाचा दुसरा भाग बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार हे त्याने सांगितले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील कलाकारांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jul 16, 2024, 08:03 PM IST
 Soldier 2 : 'सोल्जर 2'  म्ध्ये बॉबी देओल-प्रीती झिंटा एकत्र दिसणार? निर्माते काय म्हणाले?  title=

Soldier 2 : बॉबी देओलच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या सोल्जरचा दुसरा भाग 26 वर्षांनंतर येणार आहे. 1998 मध्ये रिलीज झालेला रमेश तौरानीचा सोल्जर हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटात प्रीती झिंटासोबत बॉबी देओलची जोडी होती. लोकांनी त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील केलं आहे. 

चित्रपट निर्माते रमेश तौरानी ‘सोल्जर’चा दुसरा भाग घेऊन येत आहेत. गेल्या महिन्यात निर्मात्याने 'सोल्जर 2' ला मंजुरी दिली होती. आता चित्रपटाचे शूटिंग कधी होणार हे त्यांनी सांगितले आहे. चित्रपटातील कलाकारांवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'सोल्जर 2' शूटिंगला कधी सुरुवात? 

नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रमेश तौरानी यांनी  सोल्जर 2 बाबत एक मोठं विधान केलं आहे.  पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रमेश तौरानी म्हणाले की, या चित्रपटातील कलाकार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कथा पुढे कशी आकार घेते. त्यावर ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे सोल्जर 2 मध्ये बॉबी देओल आणि प्रीती झिंटा यात सहभागी होतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

सोल्जर चित्रपटाची कथा

सोल्जर चित्रपटात बॉबी देओलने विजयची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी प्रीति झिंटाच्या प्रेमात पडल्याचे नाटक करतो. राखी गुलजार, फरीदा जलाल, सुरेश ओबेरॉय, दलीप ताहिल आणि आशिष विद्यार्थी यांसारखे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. सोल्जरची कथा प्रेक्षकांना आवडली आहे. त्यामुळे आता सोल्जर 2 मध्ये काय दाखवले जाणार आणि या चित्रपटात कोणते कलाकार असतील हे महत्वाचे ठरणार आहे.

'अल्फा' चित्रपटात बॉबी देओल

अभिनेता बॉबी देओलबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला खलनायकाच्या भूमिकेसाठी खूप मागणी आहे. लवकरच तो तमिळ स्टार सूर्याच्या पॅन इंडिया चित्रपट 'कंगुवा'मध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या गुप्तचर विश्वातही बॉबी प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या 'अल्फा' या गुप्तचर चित्रपटात देखील तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x