मुंबई : बिहार निवडणुकीचा निकाल अवघ्या काही वेळेत हातात येईल. बिहार निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभर होती. एवढंच नव्हे तर या निवडणुकीचा प्रभाव हा बॉलिवूडमध्ये देखील पाहायला मिळाला. या निवडणुकीत कलाकार देखील आपल्या जवळच्यांसाठी प्रचार करताना दिसले.
भागलपुरचे आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार अजीत शर्मा यांची मुलगी नेहा शर्मा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव यांच्यात खूप चांगली भागिदारी पाहायला मिळाली. बॉलिवूडमधून राजकारण करणारे लव सिन्हा सध्या भाजपच्या नितीन नवीनच्या मागे आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचा जन्म भागलपुरमध्ये झाला आहे. तिचे वडिल काँग्रेस नेता असून नेहाने बॉलिवूडचा मार्ग स्विकारला. मात्र निवडणुकीच्या काळात नेहा वडिलांसोबत प्रचार करताना दिसली. वडिल अजित शर्मा यांच्यासोबत तिने रोड शो केला आहे. २००७ मध्ये नेहा शर्माने तेलुगू सिनेमा 'चिरुता' मधून फिल्मी डेब्यू केलं. नेहाने मोहित सूरीच्या 'क्रूक' या हिंदी सिनेमातून डेब्यू केलं आहे.
Thank you for all the love Bhagalpur #forevergrateful pic.twitter.com/ePVOwUtvTs
— Neha Sharma (@Officialneha) November 1, 2020
लव सिन्हा बिहार विधानसभा निवडणुकीकरता बांकीपुर सीटकरता मतमोजणी सुरू केली. इथून भाजचे आमदार नितीन नवीन मतमोजणीत पुढे आहे. लव सिन्हा यांनी देखील बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं मात्र तो सिक्का तेथे चालला नाही. लव सिन्हा यांनी जेपी दत्ता यांच्या 'पलटन' सिनेमात काम केलं आहे. अभिनेता ते नेता बनले लव सिन्हा...
लव सिन्हा हे शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र आहेत. लव सिन्हा यांच्या रॅलीत अनेक बॉलिवूड कलाकार दिसले.
इंडस्ट्रीत ट्रेडिशनल लूकमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत सहभागी आहे. एकेकाळी सोनाक्षी अतिशय तब्बेतीने होती मात्र आता ती फिट अभिनेत्री आहे. सोनाक्षीचा संबंध देखील बिहारमधून आहे. सोनाक्षी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. यंदा ती आपल्या भावाच्या प्रचारासाठी रॅलीत दिसली.