लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं..., कधीही पाहिलं नसेल उर्फी जावेदचं हे रुप

पाहा कोणावर भडकली उर्फी...

Updated: Dec 31, 2021, 03:15 PM IST
लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं..., कधीही पाहिलं नसेल उर्फी जावेदचं हे रुप title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक कारणांनी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री उर्फी जावेद हिनं यावेळी महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. उर्फीची खिल्ली उडवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुस्लिम असल्याचं लक्षात येताच तिनं अशा कट्टरपंथीयांना धारेवर धरलं आहे.

एका व्हिडीओतून ती काहीशी संतापलेली दिसत आहे. कट्टपंथीयांबाबत बोलायला ती सुरुवात करणार तोच तिच्या हाहातून मांजर खाली उतरते. हे पाहून ही बिचारीपण घाबरली, असं उपरोधिकपणे उर्फी म्हणताना दिसत आहे.

मी इस्लामच्या नावाला काळीमा आहे, माझ्याविरोधात फतवा काढला पाहिजे, माझे कपडे असेच, तसेच म्हणणाऱ्यांना हे ठाऊक आहे का कुरानमध्ये असा उल्लेख नाही जिथं महिलांना बळजबरीनं चेहरा झाकावा लागण्याचा उल्लेख आहे.

महिलांनी चेहरा झाकावा असं म्हटलं गेलं असलं तरीही त्यांनी असं करण्यास नकार दिला तर त्यांना शिवीगाळी करा, निंदा करा, त्यांना चेहरा झाकण्यास भाग पाडा असं सांगण्यात आलेलं नसल्याचं तिनं स्पष्ट केलं.

लग्नाआधी कोणताही पुरुष स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहू शकत नाही, वाईट नजर झाकली गेली पाहिजे हा मुद्दा मात्र कुरानमध्ये असल्याची बाब तिनं अधोरेखित केली.

सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाहून त्यावर आक्षेपार्ह आणि गलिच्छ प्रतिक्रिया देणं म्हणजे ‘हराम’ आहे हे तुम्ही करुच नाही शकत असं तिनं बजावलं.

इस्लामचे कायदे तेव्हा आखले गेले जेव्हा महिलांना तितकेसे हक्क नव्हते. दिड हजार वर्षापूर्वी चार लग्नांना यासाठी परवानगी देण्यात आली कारण पती निधन पावल्यास महिलांचा बलात्कार होत होता. त्यांच्यावर अन्याय होत होता. महिलांच्या संरक्षणासाठीच 4 लग्नांना परवानगी होती, हा मुद्दा उर्फीनं प्रकाशात आणला.

लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं चूक आहे, पण तुम्ही तेही करताय ना असा बोचरा सवाल करत उर्फीनं आता तर तुमच्यापैकी कोणी पाच वेळा नमाजही पठण करत नसेल असं गंभीर वक्तव्य केलं. आपण इस्लाम मानत नसून अध्यात्मात विश्वास ठेवत असल्याचं तिनं स्पष्ट केलं.

चांगली कर्म करण्यावर आपला भर असल्याचं तिनं सांगितलं. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या अनेक चर्चा आणि प्रश्नांना वाव देणारा आहे.