ना तोकडे कपडे, ना बोल्ड अंदाज; पाहा उर्फीचा बेली डान्स का होतोय व्हायरल

हा व्हिडीओ चांगलाच गाजतही आहे

Updated: Nov 18, 2021, 05:29 PM IST
ना तोकडे कपडे, ना बोल्ड अंदाज; पाहा उर्फीचा बेली डान्स का होतोय व्हायरल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही कार्यक्रम संपल्यानंतरही त्यातीतल कलाकारांची चर्चा मात्र कायम सुरु असते. 'बिग बॉस' हा असाच एक कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं व्हायरल होणारं, सातत्याने चर्चेत असणारं नाव म्हणजे उर्फी जावेद. 

उर्फी दर दिवशी एका नव्या कारणानं चर्चेत येथे. कधी बोल्ड अंदाज, कधी तोकडे कपडे तर कधी आगळीवेगळी फॅशन. 

आता म्हणे सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो कमालीचा चर्चेत आला आहे. 

नुसता चर्चेत नव्हे, तर हा व्हिडीओ चांगलाच गाजतही आहे. कोणताही बोल्ड लूक नाही, आगळेवेगळे कपडेही नाहीत तरीही उर्फीच्या या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

कारण ठरतंय ते म्हणजे तिचा बेली डान्स. फ्लोरल क्रॉप टॉप लूकमध्ये उर्फीनं इथे बेली डान्स मूव्ज दाखवल्या आहेत. 

अवघ्या 7 सेकंदांच्या या व्हिडीओला असंख्य व्ह्यूजही मिळाले आहेत. तिच्या या व्हिडीओला काहींनी पसंती दिली आहे, तर काहींना मात्र तो व्हिडीओ खटकला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Indian Crush (@naughtyacts)

सोशल मीडिया ट्रोलिंगचा मुद्दा समोर आल्यावर उर्फीचं नाव कायमच चर्चेत असतं. तिला पाहून दुर्लक्ष करणारेही अनेक आहेत. पण, यावेळी मात्र उर्फीचा हा बेली डान्स सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवत आहे हे खरं.