'या' अभिनेत्रीला दुसऱ्यांदा झाला कोरोना, सोशल मीडियावर टाकली पोस्ट

कंचना 3 आणि बिग बॉस 14 फेम असलेल्या या अभिनेत्रीला दुसऱ्यांदा झाला कोरोना, ही अभिनेत्री आहे तरी कोण? 

Updated: Jul 2, 2022, 03:32 PM IST
'या' अभिनेत्रीला दुसऱ्यांदा झाला कोरोना, सोशल मीडियावर टाकली पोस्ट title=

मुंबई : बॉलिवूड सह अनेक चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. आता बिग बॉस 14 स्टार निक्की तांबोळीला कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकत याबाबत माहिती दिली आहे. निक्की तांबोळीला याआधीही कोरोना झाला होता, त्यानंतर काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली होती.  

पोस्टमध्ये काय?
बिग बॉस 14 स्टार निक्की तांबोळीने आज दुपारी एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये निक्की तांबोळी सांगितले की, “सर्वांना नमस्कार, माझी कोविड -19 ची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवले आहे. तसेच मी आवश्यक ती खबरदारी घेत असल्याची माहिती निक्की तांबोळीने पोस्टमध्ये दिली आहे.  

पोस्टमध्ये ती म्हणतेय, माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर स्वतःची चाचणी करून घ्यावी.तसेच मास्क घाला आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा, असे आवाहन तिने केले आहे.  

दरम्यान गेल्या वर्षी 26 मार्च 2021 रोजी तिला पहिल्यांदा कोरोना झाला होता. मात्र काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली होती. यावेळी अनेक युझर्सनी कमेंटमध्ये निक्कीला सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावण्यावरून सुनावलं होतं. 

'या' चित्रपटात झळकली
निक्की तांबोळीने 2019 मध्ये तेलगू चित्रपट चिकाटी गाडीलो चिथाकोतुडो या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली. ती राघव लॉरेन्सच्या कांचना 3 चित्रपटात देखील दिसली होती. सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस 14 या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली होती. 
तिने खतरों के खिलाडी 11 मध्ये देखील भाग घेतला होता. कॉमेडियन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया यांनी होस्ट केलेल्या 'खतरों के खतरा' या टीव्ही शोमध्येही तिने भाग घेतला होता. तिने काही म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केले आहे.