मुंबई : अनूप जलोटा आणि जसलीनच्या अफेअरची खूप चर्चा झाली. बिग बॉसच्या घरात याच दोघांची चर्चा होती. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये तर जसलीनला अनूप जलोटा यांनी गालावर किस करताना देखील पाहण्यात आलं. दोघांच नातं अगदी खरं असल्याचं भासत होतं तितक्यात एका टास्कने दोघांमध्ये फूट पाडली.
त्यानंतर अनूप जलोटा यांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे ब्रेकअप करण्याचा. अनूप जलोटा यांच्या या निर्णयामुळे बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना आणि चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. पण असं असलं तरीही एका व्यक्तीला या गोष्टी खूप आनंद झाला. एवढंच नाही तर या दोघांच नातं तोडण्यासाठी त्यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्याची देखील इच्छा व्यक्त केली.
ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून जसलीनचे वडिल केसर मथारू आहेत. यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, एपिसोड प्रदर्शित होण्याअगोदरच मी याचा एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यामध्ये मला जसलीन टास्कमध्ये दिसली नाही. त्यामुळे माझी जी इच्छा होती तेच झालं. एवढंच काय? तर जसलीनच्या वडिलांनी बिग बॉसच्या घरी जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत शोच्या निर्मात्यांशी बोलणं देखील केलं मात्र त्यांना यासाठी परवानगी दिली नाही.