36 वर्षे मोठ्या व्यक्तीसोबत जसलीनचं नाव जोडलं गेल्यावर, वडिलांची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले वडिल

36 वर्षे मोठ्या व्यक्तीसोबत जसलीनचं नाव जोडलं गेल्यावर, वडिलांची पहिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : बिग बॉसचा शो अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे 65 वर्षांच्या अनूप जलोटा यांच 28 वर्षाच्या जसलीनसोबत असलेलं नाही. भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. या दोघांनी अगदी सहज आपल्या नात्याचा केलेला उल्लेख सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. 

काय आहे जसलीनच्या वडिलांची प्रतिक्रिया 

या संपूर्ण प्रकारावर जसलीन मथारूचे वडिल केसर मथारू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जसलीनच्या वडिलांनी हे मान्य केलं आहे की, मुलीने केलेल्या या खुलाशामुळे मी देखील धक्क्यात आहे. सोशल मीडियावर आपली मुलगी जसलीनबद्दल जे काही बोललं जात आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी ऑनलाईन होणाऱ्या ट्रोलबद्दल काहीच बोलणार नाही. ती एक ट्रेंड सिंगर आहे. बॉलिवूडच्या अनके कलाकारांसोबत तिने शो केला आहे. माझी मुलगी चांगल्या कुटुंबातून आहे प्रसिद्ध होण्यासाठी तिला अशा प्रेमाचा वापर करण्याची गरज नाही. 

सोमवारच्या बिग बॉसच्या भागात जसलीन आणि अनूप जलोटा यांची जोडी चर्चेत राहिली. घरात प्रत्येकजण त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करत होते. मात्र ही जोडी टास्कच्या बाबतीत मात्र मागे राहिली.