बिग बॉसमध्ये शिल्पा शिंदेपेक्षा हिना खानला मिळाले जास्त पैसे?

बिग बॉसच्या ११व्या सीझनमध्ये शिल्पा शिंदेचा विजय झाला. 

Updated: Jan 22, 2018, 09:24 PM IST
बिग बॉसमध्ये शिल्पा शिंदेपेक्षा हिना खानला मिळाले जास्त पैसे? title=

मुंबई : बिग बॉसच्या ११व्या सीझनमध्ये शिल्पा शिंदेचा विजय झाला. या सीझनच्या सुरुवातीला विकाससोबत झालेल्या भांडणामुळे तर नंतर त्याच्याबरोबरच झालेल्या मैत्रीमुळे शिल्पा कायमच चर्चेत राहिली. बिग बॉसच्या दर्शकांनाही शिल्पा पसंद पडली आणि त्यामुळेच तिचा विजय झाला.

शिल्पा आणि हिनामध्ये मुकाबला

शिल्पा शिंदे आणि टीव्ही अभिनेत्री हिना खान यांच्यामध्ये बिग बॉसची फायनल पार पडली. पण आता सोशल नेटवर्किंगवर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. शिल्पा शिंदे बिग बॉस तर जिंकली पण हिना खानला शिल्पापेक्षा जास्त कमाई झाल्याचं बोललं जातंय.

हिना खाननं बिग बॉस ११च्या पहिल्या १० आठवड्यांमध्ये जवळपास १.२५ कोटी रुपये कमावले. तसंच शेवटच्या ५ आठवड्यांमध्ये तिला ५० लाख म्हणजेच एकूण १.७५ कोटी रुपये मिळाले. तर शिल्पा शिंदेला प्रत्येक आठवड्याला ५ लाख रुपये म्हणजेच एकूण ८५ लाख आणि बिग बॉस जिंकल्यामुळे ४४ लाख रुपये असे एकूण १.२९ कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे.