अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'या' प्रकरणी कारवाईला स्थगिती, निर्णय ठेवला राखून

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 26, 2024, 02:26 PM IST
अल्लू अर्जुनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, 'या' प्रकरणी कारवाईला स्थगिती, निर्णय ठेवला राखून title=

Allu Arjun : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अल्लू अर्जुनने केलेल्या आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात न्यायालयाने आपल्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. 25 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निकाल आला आहे. न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी आदेश सुनावल्याचे सांगितले आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचे वकील वाई नागी रेड्डी म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान नंदयालला भेट देणे ही त्यांची वैयक्तिक बाब होती. 

त्याचा राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद केला आहे. रिपोर्टनुसार, शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीसाठी अल्लू अर्जुनला जबाबदार धरू नये. 

अल्लू अर्जुनला कोर्टाकडून दिलासा

वकिलांनी असा युक्तिवाद केला की अल्लू अर्जुनचा दौरा कोणत्याही राजकीय अजेंडाशी संबंधित नव्हता. तेव्हा आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. या युक्तिवादानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तोपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये असं सांगण्यात आलं आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वीच साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनने हायकोर्टात धाव घेतली होती. अभिनेत्याने कलम 144 आणि पोलिस कायदा 30 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावरील खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. नंदयालचे नायब तहसीलदार यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, अभिनेता अल्लू अर्जुनने रिटर्निंग ऑफिसरच्या परवानगीशिवाय नंदयालला भेट दिली होती. परवानगीशिवाय लोकांना बोलावणे आणि जमा करणे हा नियमभंग आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. 

या दिवशी होणार 'पुष्पा 2' रिलीज

सध्या अल्लू अर्जुन त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2' मुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती. ज्यामध्ये हा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र, आता हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत फहद फासिल आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत.