मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला गेल्या पाच तासांपासून ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्रीची चौकशी केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
कशाबद्दल केली चौकशी?
एएनआयच्या ट्विटनुसार, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीत गेल्या पाच तासांपासून चौकशी करत आहे.' दरम्यान, हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे. सुकेश यांच्यावर मनी लाँडरिंग अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
Enforcement Directorate (ED) is questioning Bollywood actress Jacqueline Fernandez in Delhi for the last five hours, in a money laundering case.
(File photo) pic.twitter.com/ftUj2CkNcN
— ANI (@ANI) August 30, 2021
जॅकलीनच्या आधी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचीही मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली आहे. यामी गौतमची 7 जुलै रोजी ईडीने चौकशी केली होती. मात्र, फेमी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ईडीने यामी गौतमची चौकशी केली.
जॅकलीन 'भूत पोलीस'मुळे चर्चेत
जॅकलिन फर्नांडिस तिच्या आगामी 'भूत पोलीस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सैफ अली खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याचबरोबर यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.