बिग बी साकारणार तृतीयपंथीची भूमिका

अमिताभ बच्चन एका चित्रपटात तृतीयपंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Updated: Apr 29, 2019, 02:03 PM IST
बिग बी साकारणार तृतीयपंथीची भूमिका title=

मुंबई : समाजात तृतीयपंथींवर नेहमी अन्याय होताना दिसतो. पण हल्लीच्या काळात ते त्यांचे स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसत आहे. बॉलिवूडचे महानायक जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सर्व प्रकारच्या भूमिका चोखरित्या साकारल्या आहेत. आता ते आव्हानात्मक व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन एका चित्रपटात तृतीयपंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अमिताभ यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटात एन्ट्री केली आहे. 

जबरदस्त थ्रिलर विनोदी चित्रपटात बच्चन तृतीयपंथीची भूमिका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बी आता तेलगू सुपरहिट 'कंचना' चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी साकारणार आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची आधिकृत घोषणा केलेली नाही. 'कंचना' चित्रपयाच्या हिंदी रिमेकचे नाव 'लक्ष्मी बॉम्ब' असे ठेवण्यात आले आहे. रविवारी चित्रपटाच्या शुटिंगचे नारळ फोडण्यात येणार आहे. 

 

'कंचना' चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेंस यांनी केले होते. तर राघव लॉरेंस 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. कियाराने शुटिंग दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.