शिल्पा शिंदेला बिग बॉस कडून मिळणार ही ऑफर

कलर्स चॅनलवरील 'बिग बॉस सिझन ११' स्पर्धकांमुळे खूप चर्चेत आहे. यातील नेहमी चर्चेत असणारी स्पर्धक शिल्पा शिंदेसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Updated: Jan 8, 2018, 08:38 AM IST
शिल्पा शिंदेला बिग बॉस कडून मिळणार ही ऑफर  title=

मुंबई : कलर्स चॅनलवरील 'बिग बॉस सिझन ११' स्पर्धकांमुळे खूप चर्चेत आहे. यातील नेहमी चर्चेत असणारी स्पर्धक शिल्पा शिंदेसाठी एक आनंदाची बातमी आहे.

'बिग बॉस'चे हे सिझन संपल्यावर तिला कलर्सच्या दूसऱ्या प्रोजेक्टमध्ये घेण्यात येणार आहे. 

कलर्स टीमचे प्लानिंग 

 डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कलर्सची टीम एका नव्या शो ची प्लानिंग करत आहे. त्यामध्ये शिल्पा शिंदे मुख्य भुमिकेत असणार आहे.

जसा बिग बॉस चा शो संपले तशी लगेच तिला यासाठी ऑफर देण्यात येणार आहे. 

'मी टीव्ही शो करणार नाही'

 मी पुन्हा कोणता टीव्ही शो करणार नाही असे शिल्पाने बिग बॉसमध्ये सांगितले होते. त्यामूळे कलर्सची ऑफर ती स्वीकारते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिल्पाला बिग बॉस ११ तील प्रबळ दावेदार मानले जाते.