मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यावर्षी ७५ वर्षांचे होणार आहे. पण वयाच्या या टप्प्यांवर सुद्धा त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी, ताकद यामध्ये कुठेही कमी दिसत नाही. २०१९ पर्यंत त्याची 'वर्क डायरी' भरलेली असेल, असे बीग बींचे म्हणणे आहे. अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं की, 'एक सुदैवाची गोष्ट आहे की, मी उदयापासून पुन्हा काम सुरू करणार आहे. '१०२ नॉट आउट.' या महिन्याच्या शेवटी ऑगस्ट सुरू व्हायच्या काही दिवसाआधी त्याची शुटींग संपेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 'केबीसी' काही योजना, 'थँक्स ऑफ हिंदुस्तान' आणि त्यानंतर २०१८ मध्ये अजून काही तरी करण्याची इच्छा, २०१९ मध्येही ही प्रक्रिया सुरु राहिल.'
अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस ११ ऑक्टोबरला आहे. या चित्रपटात अभिनेता ऋषि कपूर यांचे वडील आहेत, तर फिल्म 'थँक्स ऑफ हिंदुस्तान' मध्ये पहिल्यांदाच आमिर खान बरोबर दिसणार आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत 'बीग बी'कडे अनेक सिनेमे असतील.