KBC 12: बिग बींना चकित करणारा स्पर्धक 'या' प्रश्नाचे उत्तर देण्यास ठरला असमर्थ

‘कौन बनेगा करोड़पती' तुफान चर्चेत आहे.

Updated: Nov 1, 2020, 03:00 PM IST
KBC 12: बिग बींना चकित करणारा स्पर्धक 'या' प्रश्नाचे उत्तर देण्यास ठरला असमर्थ  title=

मुंबई : सध्या सर्वत्र टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोड़पती' तुफान चर्चेत आहे. हॉट सिटवर बसलेल्या मध्यप्रदेशच्या गुजरखेडा येथील कौशलेन्द्र सिंह तोमर यांनी पत्नीची प्लासस्टिक सर्जरी करण्याची इच्छा व्यक्त करत महानायक अमिताभ बच्चन यांना चकित केलं. परंतु या प्रश्न-उत्तरांच्या खेळात त्यांना फक्त ४० हजार रूपयांपर्यंत मजल मारता आली. एकाच प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी तीन लाईफ-लाईनचा वापर केला. तर जाणून घेवूया कोणता होता तो प्रश्न.

कौन बनेगा करोड़पती या शो दरम्यान कौशलेन्द्र सिंह तोमर यांना प्रश्न विचारण्यात आला की, ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण? प्रश्नासाठी पर्याय होते. 
-पीव्ही सिंधू
-मेरी कॉम
-कर्णम मल्लेश्वरी
-साक्षी मलिक
उत्तर आहे - पीव्ही सिंधू

या प्रश्नाच्या उत्तरासाठी तोमर यांनी सर्वप्रथम 'व्हिडिओ अ फ्रेंड' या लाईफ-लाईनचा वापर केला. त्यानंतर त्यांनी ५०-५० या लाईफलाईनचा वापर केला. त्यानंतर स्क्रिनवर फक्त दोन नाव राहिले. ते म्हणजे कर्णम मल्लेश्वरी आणि पीव्ही सिंधू यांचे. तरी देखील त्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. 

त्यानंतर तोमर यांनी ‘आस्क द एक्सपर्ट’लाईफलाईनचा वापर केला. संपूर्ण लाईफलाईन संपल्यानंतर शोमधून माघार घेण्याचा निर्णय तोमर यांनी घेतला. त्यांना फक्त ४० हजार रूपये जिंकता आले. त्यानंतर त्यांना ८० हजार रूपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला. 

'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस १८५७' 'पुस्तकाचे लेखक कोण होते? या प्रश्नासाठी पर्याय होते. 
- विन्स्टन चर्चिल
- जवाहर लाल नेहरू
- विनायक दामोदर सावरकर
- रवींद्रनाथ टागोर
उत्तर आहे - विनायक दामोदर सावरकर

कौशलेंद्र सिंह हे ग्रामपंचायतीचे सचिव आहेत. बिग बींनी त्यांना खेळामध्ये जिंकलेल्या पैशांचे काय करणार असा प्रश्न विचारला. तेव्हा तोमर म्हणाले, मला माझ्या गावासाठी हे पैसे वापरायचे आहेत. शिवाय पत्नीची प्लास्टिक सर्जरी करायची असल्याचं ते मस्करीमध्ये म्हणाले. 

हे ऐकून बिग बी आणि तिथे बसलेल्या प्रेक्षकांना धक्का बसला. अमिताभ यांनी तोमरला विचारले की, आपल्या पत्नीची प्लास्टिक सर्जरी का करायची आहे? त्यावर तोमर म्हणाले गेले १५ वर्ष एकच चेहरा पाहून फार कंटाळा आला आहे.