'बाबूमोशाय बंदूकबाज'नंतर आता या सिनेमात दिसणार बिदिता बाग

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत 'बाबूमोशाय बंदूकबाज'मध्ये दिसलेली अभिनेत्री बिदिता बाग लवकरच आणखी एका सिनेमात दिसणार आहे. 'मोक्ष टू माया' या महिला अत्याचारावर आधारित सिनेमात बिदिता दिसणार आहे. 

Shubhangi Palve Updated: Apr 7, 2018, 07:36 PM IST
'बाबूमोशाय बंदूकबाज'नंतर आता या सिनेमात दिसणार बिदिता बाग title=

मुंबई : गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत 'बाबूमोशाय बंदूकबाज'मध्ये दिसलेली अभिनेत्री बिदिता बाग लवकरच आणखी एका सिनेमात दिसणार आहे. 'मोक्ष टू माया' या महिला अत्याचारावर आधारित सिनेमात बिदिता दिसणार आहे. 

'मोक्ष टू माया' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. हा सिनेमा सध्या पोस्ट प्रोडक्शन फेजमध्ये आहे आणि लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बिदितासोबत सय्यद रजा असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बिदिता या सिनेमाबद्दल खूपच उत्साही आहे आणि या नव्या सिनेमातील भूमिका आपल्यासाठी खूपच आव्हानात्मक होती, असंही बिदितानं म्हटलंय. 

या सिनेमात बिदिता मुख्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. बिदिताचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला. परंतु, तिनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या भाषांच्या सिनेमांत काम करून लोकांना प्रभावित केलंय. महाविद्यालयात शिकत असल्यापासून बिदितानं मॉडेलिंग सुरू केलंय. आज ती एक प्रोफेशनल मॉडेलदेखील आहे.

२०११ साली सिनेमांत पदार्पण केलेल्या बिदितानं 'मुक्ती'मध्ये पहिल्यांदा काम केलं. त्यानंतर बिदितानं आसामी, हिंदी, ओडिसा या भाषांमध्ये काम केलंय. 

बिदिताचा पहिला हिंदी सिनेमा 'फ्रॉम सिडनी विथ लव' हा होता... परंतु, तिला खरी ओळख मिळाली ती 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमातून... यामधला बिदिता आणि नवाझुद्दीनचा किसिंग सीन खूपच चर्चेत राहिला.   

'मोक्ष टू माया' या सिनेमाचा निर्माता नीरज भारद्वाज, श्वेता ठाकूर आणि कृष्णा आहे तर मनोज सिंह यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय.