VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शन

Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam : भाऊ कदमच्या लेकीनं शेअर केला तो व्हिडीयो...

दिक्षा पाटील | Updated: Apr 21, 2024, 01:54 PM IST
VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शन title=
(Photo Credit : Social Media)

Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी किंग आपल्या सगळ्यांचा लाडका भाऊ कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी शोमुळे चर्चेत आहे. भाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, यावेळी मृण्मयीनं पहिल्या पगारातून आई-वडिलांना काही भेट दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा केला आहे. 

मृण्मयी ही एक डिजीटल कॉन्टेन्ट क्रिएटर आहे. मृण्मयी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या मृण्मयीनं आता एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिनं पहिल्या पगारातून वडिलांना भेटवस्तू दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती हे देखील सांगितलं आहे. मृण्मयीनं गेल्या महिन्यात तिच्या आईला परफ्युम भेट केला होता. तर यामहिन्यात वडील म्हणजेच भाऊ कदमला बुट भेट केले आहेत. या व्हिडीओत मृण्मयी ही संपूर्ण दिवसात काय झालं ते सांगत व्हिडीओ दाखवते. ती सुरुवातील तिच्या वडिलांना बूट घेते. पण घ्यायला जाताना भाऊला वाटलं की तो त्याच्याच पैशांनी त्याला बूट घेतोय. पण जेव्हा मृण्मयीनं ते बूट त्याला गिफ्ट केले तेव्हा तिचे आभार न मानता तिला भाऊ ओरडू लागला? पैसे कशाला खर्च करायचे तुझ्याजवळ खर्चासाठी ठेवले असते वगैरे. भाऊच्या या प्रेमाच्या ओरडण्यावर मृण्मयीला त्याची काळजी आणि प्रेम दिसतं असं तिनं सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : कलाकारांच्या मागणीला कंटाळली फराह खान म्हणाली, 'चार व्हॅनिटी व्हॅन मागतात आणि...'

तर हा व्हिडीओ शेअर करत मृण्मयीनं कॅप्शन दिलं की "माझ्या खास व्यक्तीसाठी. नेहमीच मला पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते. तुम्हाला माझ्यावर गर्व असेल याची आशा करते आणि मला माहितीये की तुम्ही आहात. मला नेहमीच माझ्या पहिल्या पगारातून तुम्हाला काहीतरी भेट करायचं होतं. तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी मी थोडी बचत केली होती. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही घ्यायचं आहे ते घेऊन देण्यासाठई तुमची लेक सज्ज आहे. तुम्ही मला कितीही ओरडलात तरी मी कधीच तुम्हाला गिफ्ट देणं थांबणार यावर विश्वास ठेवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इतकी चांगली व्यक्ती होण्यासाठी आणि सगळ्याच चांगले वडील होण्यासाठी मी आभारी आहे." दरम्यान, मृण्मयीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.