मुंबई : भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजेचं आपल्या सर्वांचे लाडके भाऊ कदम. प्रत्येक मोठ्या कलाकाराने यशाचा हा टप्पा गाढण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलली असते. अशाचं कलाकारांमध्ये भाऊ कदम यांचा देखील समावेश आहे. भालचंद्र हे नाव फार मोठं असल्यामुळे त्यांना पूर्वीपासून कायम भाऊ म्हणून सर्वजण हाक मारत असे. भाऊ कदम यांचे वडील भारत पेट्रोलियम मध्ये काम करायचे त्यांची आई गृहिणीच होती. भाऊ लहानपणापासूनचं ते अत्यंत खोडकर होते.
शाळेत असताना भाऊ कायम नाटकांमध्ये भाग घ्यायचे. पण त्यांना कायम वाटायचं आपल्या रंगामुळे आणि दिसण्यामुळे आपण काही नट होवू शकत नाही. पण उत्तम नट होण्याची ही व्याख्या भाऊ कदम यांनी खोडून टाकली आहे. भाऊ लहान असताना त्यांची परिस्थिती गरिबीची होती. वडिलांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण कुंटुंबाची जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर आली.
त्यावेळी ते नाटकांमध्ये काम करायचे. कालांतराने कदम कुटुंब डोंबिवलीत आलं. नाटकांमध्ये काम केल्यानंतर कुटुंबाची भूक भागेल एवढे पैसे देखील मिळत नव्हते. म्हणून त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि दिवसभर पानटपरीवर पान सुपारी विकू लागले. पण नशिबात काही वेगळचं होतं.
तो सोन्याचा दिवस आला आणि आपल्याला विनोदवीर भाऊ कदम भेटले. एकदा भाऊ यांच्या घरी दिग्दर्शक विजय निकम आले. त्यांनी भाऊंना नाटकात काम करण्याचा आग्रह केला. भाऊ यांनी देखील शेवटची संधी म्हणून नाटकात काम केलं आणि त्या नाटकाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पाहिलं नाही.
त्यानंतर भाऊ यांनी झी मराठी वरील 'फू बाई फू' या कॉमेडी नाटकात काम करण्याची संधी चालून आली. पण टीव्हीवर आपल्याला काम करायला जमेल का? असा प्रश्न त्यांना आतल्या आत खात होता. त्यांनी ही ऑफर नाकारली. तेव्हा त्यांच्या पत्नी आणि मुलीने भाऊ यांना समजावले. तेव्हा ते काम करण्यासाठी तयार झाले.
भाऊ कदम यांचे काम पाहून त्यांना झी मराठी ने 'फू बाई फू'च्या तिसऱ्या भागासाठी भाऊ कदम यांना ऑफर दिली. आता 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा बोलबाला तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. यमध्ये देखील भाऊ यांचं अभिनय आणि विनोदीबुद्धी चाहत्यांना पोट धरून हासण्यास भाग पाडते.