Bhau Kadam ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, व्हायरल फोटो पाहून तुम्हीही...

Bhau Kadam चा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Jan 25, 2023, 12:57 PM IST
Bhau Kadam ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, व्हायरल फोटो पाहून तुम्हीही... title=

Bhau Kadam : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) हा शो लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोनं प्रेक्षकांना हसून हसून वेड लावलं. या शोमधील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam), श्रेया बुगडे (Shreya Bugade) पर्यंत सगळेच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. भाऊ कदमने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. फक्त करिअर नाही तर पर्सनल आयुष्यामुळे नेहमच चर्चेत राहणारा भाऊ कदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाऊ कदमचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून भाऊ कदमचे चाहते चिंतेत आले आहेत. 

भाऊ कदमचा हा फोटो खरंतर 'नशीबवान' (Nashibwan) या चित्रपटातील आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असल्याचे आपल्याला त्या चित्रपटात पाहायला मिळाले. 

Bhau Kadam Chala Hava Yeu Dya viral photo as a cleaner photo viral

'नशीबवान' या चित्रपटाची बहुतांशी शूटिंग ही मुलुंड मध्ये झाली आहे. 'नशीबवान'  हा चित्रपट उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत आहे.  हा चित्रपट 11 जानेवारी 2019 साली प्रदर्शित झाला होता. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल याची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्माती अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी केली आहे. प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या चित्रपटाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. भाऊ कदमनं त्याच्या करिअरच्या सुरुवातील प्रचंड संघर्ष करावा लागत होता. आज भाऊ कदमनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर उंचीचं शिखर गाठलं आहे. 

हेही वाचा : वरुण-नताशाच्या Anniversary पार्टीत अशा अवतरल्या Malaika Arora आणि Janhvi Kapoor, लूक पाहून थक्क व्हाल 

1991 साली भाऊ कदमनं नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्याची अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्याची लोकप्रियता झी मराठी वाहिनावरील 'फू बाई फूच्या' या कार्यक्रमातून झाली. भाऊ कदमनं मराठी सोबतच हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. 500 पेक्षा अधिक नाटके, नऊ पेक्षा जास्त मालिका आणि चित्रपटात अभिनय केला आहे.