मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत. एप्रिल महिन्यात 13 ते 15 तारखेला दोघे लग्न करणार असल्याचं समजत आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आलिया आणि रणबीर लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाबद्दल रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत.
ऐकीकडे रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे भट्ट कुटुंबाचा पहिला जावई म्हणजे अभिनेत्री पूजा भट्टचा पती कोठे आहे? अशी चर्चा तुफान रंगत आहे.
महेश भट्ट यांची मुलगी पुजा भट्टचं लग्न अभिनेता आणि व्हिडीयो जॉकी, रेस्टोरेंटचा मालक मनीष मखीजासोबत झालं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही..
दोघांची ओळख 2003 साली महेश भट्ट यांच्या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. सिनेमात मनीषने छोटी भूमिका देखील साकारली. दोन महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.
पूजा आणि मनीष जवळपास 11 वर्ष एकत्र होते. पण 2014 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही...
पूजा भट्टपासून विभक्त झाल्यानंतर मनीषने नेहा गुप्ता नावाच्या महिलेसोबत लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगा देखील आहे. मनीष आता दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.