'भाग मिल्खा भाग'ला ६ वर्ष पूर्ण; फरहानची भावनिक प्रतिक्रिया

'भाग मिल्खा भाग' चित्रपटाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली.

Updated: Jul 12, 2019, 08:27 PM IST
'भाग मिल्खा भाग'ला ६ वर्ष पूर्ण; फरहानची भावनिक प्रतिक्रिया title=

मुंबई : अभिनेता फरहान अख्तर बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारताना पाहायला मिळतो. कधी दिग्दर्शकाच्या रुपात, कधी अभिनेता म्हणून तर कधी गाणं गात, अशा विविध रुपात फरहानने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. २०१३ मध्ये आलेल्या फरहानच्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. 'भाग मिल्खा भाग'ला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने फरहानने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

फरहानने ''भाग मिल्खा भाग'ला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं आहे. चाहत्यांनी या चित्रपटाला जितकं प्रेम दिलं आणि आजही देत आहेत, त्यासाठी मी सर्वांचा आभारी असल्याचं' फरहानने म्हटलं आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित हा चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. मिल्खा सिंह धावपटू आहेत. 'भाग मिल्खा भाग'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. फरहान आणि सोनम कपूर व्यतिरिक्त दिव्या दत्ता, मीशा शफी, पवन मल्होत्रा यांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

फरहान सध्या त्याच्या आगामी 'तूफान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. या चित्रपटात फरहान एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे.