असं कुठे ऐकलंय का, लग्नाआधीच कतरिनाचं बाळासाठी प्लानिंग

सर्वच गोष्टींबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे.   

Updated: Dec 2, 2021, 12:02 PM IST
असं कुठे ऐकलंय का, लग्नाआधीच कतरिनाचं बाळासाठी प्लानिंग title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. पाहुण्यांपासून ते अगदी ही नवविवाहित जोडी कुठं राहणार इथपर्यंत सर्वच गोष्टींबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे. 

कतरिनाचं लग्नानंतर कोणतं प्लानिंग असेल हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे. अशातच आता, कतरिना लग्नाआधी नेमका कोणता विचार करतेय ही बाब समोर आली आहे. 

कतरिनानं आतापासूनच आपल्या मुलांच्या संगोपनाचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. थोडक्यात काय, तर लग्नाच्या आधीपासून ही अभिनेत्री बाळाबाबत विचार करु लागली आहे असं म्हटलं जातंय. 

कतरिना असा विचार करण्यास कारणीभूत ठरत आहे ते म्हणजे तिचं खासगी आयुष्य. 

वडिलांनी आई आणि भावंडांना सोडल्यानंतर कतरिनाच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. तिच्या आईनंच सर्वांना सांभाळलं. 

आईची उपस्थिती असतानाही वडिलांचं नसणं, कतरिनाला कायम सतावत होतं. त्यामुळेच तिनं ठरवलं की जेव्हा केव्हा मुलं होतील त्यावेळी त्यांना नेमकं कोणत्या वातावरणात मोठं करायचं याचाही विचार तिनं केला होता. 

एका मुलाखतीत कतरिना म्हणालेली, 'वडिलांचं नसणं जीवनात एक पोकळी निर्माण करुन जातं. ही पोकळी कोणीही भरु शकत नाही. जेव्हा माझी मुलं होतील, त्यावेळी मी ही गोष्ट कायम ध्यानी ठेवेन की त्यांना  दोन्ही पालकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.'

कोणत्याही संकटात सापडलं असता, त्यावेळी वडील असते तर नेमकं काय झालं असतं असाच विचार कतरिना करते. यावरनच तिच्या जीवनात एका महत्त्वाच्या व्यक्तीचं नसणं किती मोठा फरक पाडतं हेच स्पष्ट होतं.