या कारणामुळे सलमान खानने केलं नाही लग्न, अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Mar 7, 2022, 07:15 PM IST
या कारणामुळे सलमान खानने केलं नाही लग्न, अभिनेत्याचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : सुपरस्टार सलमान खानने आत्तापर्यंत लग्न केलं नाहीये. मात्र त्याचं लग्न कधी होणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमी पडतो. आता सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो लग्नाला घेवून  ते आपल्या गर्लफ्रेंड्सला घेवून बोलताना दिसत आहे.

सलमानने लग्नाला घेवून केलं हे वक्तव्य
सलमान खानने इंस्टाग्राम अकांऊन्टवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका नवीन कंपनीची जाहिरात आहे. जी जाहिरात सलमान खान करत आहे. मात्र अभिनेत्याने पर्सनल लाईफला घेवून जे वक्तव्य केलं आहे. ते खूपच मजेदार आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं जावू शकतं की, सलमान खान आपल्या यंग वर्जनसोबत बोलत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'सगळ्या गर्लफ्रेंड्सची लग्न झाली'
सलमान खान 'हम आपके है कौन' या चित्रपटातील प्रेमला म्हणतो की, प्रेम, तू आमचं स्वागत करणार नाहीस का? सलमानला पाहून प्रेमला धक्का बसतो. सलमान म्हणतो, मी तुझ्या फ्यूचरमधून आलो आहे. यानंतर प्रेमने सलमानच्या बायसेप्सला स्पर्श केला. प्रेमने सलमानला विचारलं - लग्न? यावर सलमान म्हणतो,  झालं, तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंडचं लग्न. हे ऐकून प्रेम थोडा निराश होतो.