या कारणामुळे करिना साजरी करत नाही होळी,  ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

आजही सेलेब्स मोठ्या थाटामाटात होळी साजरी करतात. 

Updated: Mar 15, 2022, 09:04 PM IST
या कारणामुळे करिना साजरी करत नाही होळी,  ऐकून तुमच्याही डोळ्यात  पाणी येईल  title=

मुंबई : होळीचा सण कोणाला आवडत नाही?  रंगांनी भिजलेलं अंग, स्वादिष्ट पदार्थ आणि धुमाकूळ त्यातही जेव्हा बॉलीवूड सेलिब्रिटी जेव्हा होळी साजरी करतात, तेव्हा काय बोलावं. आजही सेलेब्स मोठ्या थाटामाटात होळी साजरी करतात. मात्र करीना कपूर होळी साजरी करायत नाही, आता तिला होळी साजरी करायला तितकीशी आवडतही नाही आणि याला कारण आहे तिचे आजोबा राज कपूर.

करीना तिचे आजोबा राज कपूर यांची खूप लाडकी होती. आणि राज कपूर असताना आरके स्टुडिओत खेळली जाणारी होळी काही औरच होती. कपूर घराण्याच्या आरके स्टुडिओमध्ये होणाऱ्या या होळीत  खूप धमाल मस्ती असायची.  ज्यामध्ये कपूर कुटुंबाव्यतिरिक्त संपूर्ण बॉलिवूड सहभागी असायचं. मग तो मोठा सेलिब्रिटी असो वा लहान कलाकार. कपूर घराण्याच्या होळीत सगळेजण सहभागी व्हायचे. त्याचबरोबर, करीन कपूर देखील अनेक वर्षांपासून या होळीचा एक भाग बनली होती. पण राज कपूर यांच्या निधनानंतर ही होळी मोठ्या थाटामाटत साजरी करत नाहीत.

कपूर परिवार साधेपणाने होळी साजरी करतं
राज कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबासाठी होळीचा अर्थच बदलला. त्यांच्या मृत्यूनंतर आरके स्टुडिओमध्ये कधीही होळी साजरी झाली नाही. आता कपूर कुटुंबाला फक्त होळी साधेपणाने साजरी करायला आवडते. होळीच्या दिवशी सर्वजण एकमेकांना भेटतात आणि रंग लावतात, पण पूर्वीचा थाट आणि वैभव आता दिसत नाही. एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितलं की, होळी तिच्या आजोबांच्या आठवणींशी निगडीत आहे आणि आज तिला त्यांच्याशिवाय होळी खेळण्यात मजा येत नाही. त्यामुळे आता तिने होळीचा सण साधेपणाने साजरा करण्यास सुरुवात केली आहे.