बसपन का प्यार' फेम चिमुकल्याचा नवा व्हिडीओ व्हायरल 

बसपन का प्यार' गाणं गाऊन इंटरनेटवर सेन्सेशन बनलेला सहदेव दिरदो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

Updated: Sep 6, 2021, 03:57 PM IST
बसपन का प्यार' फेम चिमुकल्याचा नवा व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : बसपन का प्यार' गाणं गाऊन इंटरनेटवर सेन्सेशन बनलेला सहदेव दिरदो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो नेटफ्लिक्सची लोकप्रिय सिरीज 'मनी हाईस्ट'चं ट्रॅक गाताना दिसत आहे. सहदेव आपल्याच शैलीत 'बेला चाओ बेला चाओ' गाणं गात आहेत आणि ते लोकांना प्रचंड आवडत आहे. युजर्स गाण्यावर खूप कमेंट करत आहेत आणि शेअर करत आहेत. याचबरोबर सहदेवची स्तुतीही करत आहेत.

सहदेवचं बदललं आयुष्य 
'बसपन का प्यार' या गाण्यानंतर छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेवचं आयुष्य बदललं आहे. त्याचं गाणं इतकं लोकप्रिय झालं की, प्रसिद्ध बॉलिवूड रॅपर बादशाहने त्याला मुंबईला बोलावलं आणि त्याच्यासोबत गाणं रेकॉर्ड केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सहदेव 'इंडियन आयडॉल'मध्ये आला
या व्यतिरिक्त, जेव्हा सहदेव 'इंडियन आयडॉल 12' च्या मंचावर पोहोचला, तेव्हा छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही त्याला भेटले आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. सगळ्या सेलिब्रिटींनी इंस्टाग्राम अकाऊंटवर सहदेवच्या गाण्यावर रिल्स बनवून शेअर केले आहेत.