बप्पी लहरी यांचा शेवटचा फोटो, चाहते भावुक

डिस्को किंग काळाच्या पडद्याआड... बॉलिवूड आणि संगीत जगतातून हळहळ व्यक्त....   

Updated: Feb 17, 2022, 03:29 PM IST
बप्पी लहरी यांचा शेवटचा फोटो, चाहते भावुक  title=

मुंबई  : डिस्को किंग बप्पी लहरी यांना आज प्रत्येकाने जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनात आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. बप्पी दा यांचं निधन गुरूवारी झालं. त्यांच्यावर आज पवन हंस स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

त्यांचा फोटो पाहुन बॉलिवूड विश्वासोबतचं चाहते देखील भावुक झाले आहेत. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आहे. बप्पी लहरी हे त्यांच्या मनमिळाऊ आणि तितक्याच प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जात होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार बप्पी दा साधारण एक महिन्यापासून रुग्णालयात होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आलं. पण, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

बप्पी लहरी यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. OSA (ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया) यामुळे त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. आता फक्त त्यांचा आठवणी आपल्यात जिवंत राहणार आहेत.