'हा' कलाकार नरेंद्र मोदींवर नाराज, म्हणाला...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो.

Updated: Nov 3, 2019, 05:19 PM IST
'हा' कलाकार नरेंद्र मोदींवर नाराज, म्हणाला... title=

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो. परंतु प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम हे पंतप्रधानांच्या भेटीनंतर मात्र नाराज झाले आहेत. वेग-वेगळ्या सेलेब्रिटींसोबत करण्यात आलेल्या वर्तवणुकीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बालासुब्रमण्यम नेहमी सडेतोडपणे अपलं मत व्यक्त करतात. 

पंतप्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या वर्तवणुकीचा खुलासा त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. ' २९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मला रामोजी रावजींमुळे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.' असे ते म्हणाले. 

पुढे नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, 'त्या परिसरातील सुरक्षारक्षकांनी आमचे फोन घेतले आणि आम्हाला टोकन देण्यात आले. परंतु मी काही सेलेब्रिटींना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फीचा आनंद घेत असताना पाहिले.' त्यामुळे बालासुब्रमण्यम यांनी घडल्या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'Change Within' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळेस शाहरूख खान, आमिर खान, कृती सेनन, एकता कपूर आणि कंगणा रानौत त्याचबरोबर अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.