बाईपण भारीच! 5 कोटींचं बजेट अन् 14 दिवसातच चित्रपटाची कमाई सातपट

BaiPan Bhari Deva Box Office Collection: बाईपण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ५ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने आता तिप्पट कमावले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 14, 2023, 09:36 PM IST
बाईपण भारीच! 5 कोटींचं बजेट अन् 14 दिवसातच चित्रपटाची कमाई सातपट title=
Baipan Bhari Deva netts huge Rs 36crores after 14nd weekend at box office

BaiPan Bhari Deva Box Office Collection: उत्तम कथा, दमदार अभिनय, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे संवाद आणि दिग्दर्शकाची कमाल हे सगळं समीकरण जुळून आल्याने चित्रपट सुपर डुपर हिट तर होतोच पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यदेखील गाजवतो. केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुल गाजवतोय. अवघ्या 5 कोटींचे बजेट असलेला या सिनेमाने आत्तापर्यंत 37 कोटींचा पल्ला गाठला आहे. बॉलिवूडला टक्कर देणाऱ्या चित्रपटाच्या टीमचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका असलेला बाई पण भारी देवा सध्या प्रेक्षकांची मन जिंकत आहे. चित्रपटाने 14 दिवसांपर्यंत 37.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने 14 व्या दिवशी 2.50 कोटी कमावले आहेत. बाई पण भारी देवाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 6.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कलेक्शन करणारी मराठी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

दुसऱ्या पहिल्या आठवड्यात 12.50 कोटींचा टप्पा गाठला तर दुसऱ्या दिवशी तब्बल 13.05 कोटींचा गल्ला जमवत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सहा महिलांची जादू प्रेक्षकांवर चालली आहे. बाईपण बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत आहे. चित्रपटासाठी महिला प्रेक्षक गर्दी करत आहेत. 

चित्रपटासाठी महिलावर्गाची गर्दी

चित्रपटासाठी महिलावर्गाची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. मैत्रिणींसह, सोसायटींचा ग्रुप, आई-लेक किंवा सासू- सून चित्रपटासाठी गर्दी करु लागल्या आहे. महिला प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. मुंबई, पुणे नागपूर, ठाणे याठिकाणी तर चित्रपट विकेंडला हाऊसफूल होत आहे. 

वेडनंतर बाईपण भारीच...

मराठीतील सर्वाधिक कमाईचा विक्रम आजही सैराटच्या नावावर कायम आहे. त्याखालोखाल रिकेश देशमुखच्या वेडने मराठी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. त्यानंतर आता केदार शिंदेंच्या बाई पण भारी देवाने धुमाकूळ घातला आहे. सध्या या चित्रपटाचे 750 स्क्रीन्सवर चित्रपट दाखवला जात आहे. तर, 14 हजारांहून अधिक शो सुरू आहेत. भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.