'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर! बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं केली इतक्या कोटींची कमाई की प्रेक्षकांना देखील आश्चर्य आणि आनंद देखील होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 31, 2023, 05:26 PM IST
'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Baipan Bhari Deva : गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 1 महिना झाला तरी अनेकांना या चित्रपटाचं वेड आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग्स आणि त्याचसोबत गाणी व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. सगळीकडे सोशल मीडियावर फक्त 'बाईपण भारी देवा' आपल्याला पाहायला मिळतयं. या चित्रपटानं सगळ्यांची फक्त मने जिंकली नाही तर त्यासोबत चित्रपटानं एक वेगळा रेकॉर्ड केला आहे. आधीच चित्रपटानं कोट्यावधींची कमाई केली असताना, त्यानं बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुखच्या वेड या चित्रपटाला मागे टाकत एक नवा रेकॉर्ड केला आहे. 

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट थिएटरमध्ये असताना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात सत्यप्रेम की कथा हा देखील चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली. तरी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर त्याचा कोणताही फरक पडला नाही. इतकंच नाही तर हा चित्रपट देखील आपले प्रेक्षक खेचून घेऊन जाऊ शकला नाही. यानंतर नुकताच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानं भारतभर चांगली कमाई केली असली तरी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना इतक्या सोप्या पद्धतीनं खेचून घेऊ शकला नाही. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीला फक्त 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 83. 50 कोटींची कमाई केली. तर इतकी कमाई करत हा चित्रपट सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या नंबरवर वेड हा चित्रपट आहे. वेड चित्रपटानं संपूर्ण भारतात 75 कोटींची कमाई केली. जर बाईपण भारी देवा हा चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर तो लवकरच पहिल्या नंबरवर असलेल्या सैराट या चित्रपटाला मागे टाकेल अशी आशा अनेकांना आहे. सैराट चित्रपटानं 110 कोटींती कमाई केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला 'बाईपण भारी देवा'ची संपूर्ण कलाकरांची टीम, तसंच दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माती माधुरी भोसले, सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. तसंच या सक्सेस पार्टीत अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती अभिनेते संजय मोने, वंदना गुप्ते यांचे पती शिराष गुप्ते, दीपा परब हिचे पती अभिनेता अंकुश चौधरी, रोहिणी हट्टंगडी यांचा मुलगा असिम आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांची विशेष उपस्थिती सर्वांनाच सरप्राईज देणारी ठरली