बागी २ चे दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला...

टायगर-दिशाच्या बागी २ सिनेमाचे आज दूसरे गाणे प्रदर्शित झाले.

Updated: Mar 9, 2018, 01:11 PM IST
बागी २ चे दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला... title=

नवी दिल्ली : टायगर-दिशाच्या बागी २ सिनेमाचे आज दूसरे गाणे प्रदर्शित झाले. पहिल्या गाण्यात दिशा-टायगरचा पंजाबी गाण्यावरील भांगडा पाहायला मिळाला. तर दुसऱ्या गाण्यात त्यांची रोमान्टीक केमिस्‍ट्री पाहायला मिळणार आहे. ओ साथी असे गाण्याचे बोल असून संगीत अरको प्रावो मुखर्जी यांनी हे गाणे लिहिले आहे आणि गायले आहे.

अलिकडेच बागी २ चा ट्रेलर अनोख्या ढंगात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये टायगरची अॅक्शन अधिक पाहायला मिळत आहे. आता या गाण्यातून त्याचा रोमान्टीक अंदाज समोर येईल.

पहा गाण्याचा व्हिडिओ...

ट्रेलर लॉन्चिंगची गंमत

दिग्दर्शक अहमद खान, निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा बागी २ हा सिनेमा ग्रॅंडसन इंटरटेनमेंट द्वारा प्रस्तूत केला जाईल. सिनेमात टायगरचा अॅक्शनपॅक पाहायला मिळणार आहे. बागी २ च्या निर्मात्यांनी बागी २ चा ट्रेलर मुंबईच्या रेसकोर्समध्ये अनोख्या अंदाजात प्रदर्शित केला. मुंबईच्या रेसकोर्सवर टायगर-दिशाची जोडी हेलीकॉप्टरमधून उतरली. 

सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बागी या २०१६ मध्ये आलेल्या सिनेमाचा हा सिक्वल असून त्यात श्रद्धा आणि टायगरची जोडी पाहायला मिळाली होती. बागी २ च्या प्रदर्शनापूर्वीच बागी ३ ची घोषणा करण्यात आली आहे. बागी ३ चे शूटींग डिसेंबर २०१८ पासून सुरू होईल.
तर बागी २ ३० मार्च २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.