मल्टीस्टारर ‘बादशाहो’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या आगामी बहुचर्चीत ‘बादशाहो’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 7, 2017, 07:23 PM IST
मल्टीस्टारर ‘बादशाहो’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज title=

मुंबई : दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या आगामी बहुचर्चीत ‘बादशाहो’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

अजय देवगण, इम्रान हाश्मी, विद्युत जामवाल, संजय मिश्रा, इलियाना डिक्रुज आणि ईशा गुप्ता अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात नक्कीच काहीतर धमाकेदार बघायला मिळणार, असं सध्या ट्रेलरवरून तरी दिसतंय. 

आणिबाणीच्या काळातील एका चोरीवर हा सिनेमा आधारित असून अ‍ॅक्शन, रोमान्स, थ्रिलर हा सगळा मसाला या सिनेमात बघायला मिळणार असल्याचं दिसतं. त्यात या सिनेमाकडे प्रेक्षकांना अधिक आकर्षित करण्यासाठी या सिनेमात इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीवर एक गाणंही शूट करण्यात आलंय. त्यामुळे त्यांचे चाहतेही या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे गाणं चांगलंच गाजत आहे. 

अजय देवगण आणि इम्रान हाश्मी ही जोडी दुस-यांना या सिनेमाच्या निमित्ताचे एकत्र बघायला मिळणार आहे. या दोघांची जुगलबंदी याआधी ‘वन अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात बघायला मिळाली होती. यात अजय देवगण आणि इलियाना डिक्रुज यांचा रावडी रोमान्सही बघायला मिळणार आहे. येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.