अबू आझमींमुळे Ayesha Takia ला आली होती तोंड लपवण्याची वेळ

Ayesha Takia Birthday Special :  आयशा टाकियाचा आज 37 वा वाढदिवस आहे. दरम्यान, आयशानं धर्म परिवर्तन करत सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी विवाह केला. फरहान आझमीशी विवाह केल्यानंतर आयशा चित्रपटसृष्टीपासून लांब झाली. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2023, 02:23 PM IST
अबू आझमींमुळे Ayesha Takia ला आली होती तोंड लपवण्याची वेळ title=
(Photo Credit : Ayesha Takia Instagram)

Ayesha Takia Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाही (Ayesha Takia) 'टारझन: द वंडर कार' आणि 'वॉन्टेड' या चित्रपटांसाठी ओळखली जाते. आज 10 एप्रिल आयशाचा 37 वा वाढदिवस आहे. आयशाच्या फिल्मी करिअरची जितकी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा ही तिच्या खासगी आयुष्याची झाली आहे. तुम्हाला माहितीये का? आयशानं इस्लाम धर्म स्वीकारला असून सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले आहे. दरम्यान, लग्नानंतर आयशा टाकिया चित्रपटापासून दूर गेली होती. 

आयशानं जेव्हा चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा ती करिअरच्या शिखरावर होती. आयशासाठी तिचा पती फरहान हा नेहमीच उभा राहिला आहे. पण आयशाला कधीच तिचे सासरे अबू आझमी तिच्या मदतीसाठी आले नाहीत. तर बऱ्याचवेळा अबू आझमी यांच्यामुळे आयशाला तोंड लपवण्याची वेळ आली होती. हेच नाही, तर एकदा अबू आझमी यांनी असं वक्तव्य केलं होतं की आयशा आणि तिचा पती फरहानला सगळ्यांची पब्लिकली माफी मागावी लागली होती. 

Ayesha Takia Birthday Special actress got ashamed of father in law Abu Azmi left films after converting to islam and marriage

2014 साली अबू आझमी यांनी लैंगिक शोषणाविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर फरहान आणि आयशा हे दोघेही वेगळे राहू लागले होते. तर असं काय म्हणाले होते अबू आजमी. अबू आजमी यांना जेव्हा वाढत्या लैंगिक शोषणाच्या संख्येवर उपाय विचारले होते तेव्हा ते म्हणाले की, ज्या महिला सहमतीनं किंवा मग कोणाच्याही सहमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवतात त्यांना फाशी दिली पाहिजे. इस्लाममध्ये लैंगिक शोषणाला फाशीची शिक्षा आहे, असं ते म्हणाले. महिलांना तर कोणतीही शिक्षा होत नाही, पुरुषांना शिक्षा मिळते. 

हेही वाचा : 'अब आगे-आगे देखो होता है क्या...', करण जोहरच्या पोस्टवर Kangana Ranaut चा टोला

त्यानंतर आयशानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांची जाहिरपणे माफी मागितली होती. आयशा म्हणाली होती की माझ्या सासऱ्यांनी जे वक्तव्य केलं आहे तसे माझे आणि फरहानचे विचार नाहीत. आम्हाला दोघांना याची लाज वाटते. महिलांविषयी केलेलं हे वक्तव्य अपमानकारक आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर 2017 साली देखील महिलांविषयी अबू आझमी यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यात अबू आझमी हे बंगळुरूमध्ये काही महिलांसोबत झालेल्या गैरवर्तनावर अबू आझमी बोलले होते. त्यावेळी अबू आझमी म्हणाले होते की जिथे साखर असेल तिथे मुंग्या येतील, जिथे पेट्रोल असेल तिथे आग तर लागणारच आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी आयशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तुमच्या सुनेसोबत असं काही झालं तर चालेल का असा सवाल केला होता.