मैट्रिक्स फाइट नाइटच्या 11व्या आवृत्तीसाठी आयशा आणि कृष्णा श्रॉफ खूप खुश

आयेशा आणि कृष्णा यांनी पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात मॅट्रिक्स फाईट नाईट  ची 11 एडिशन ची यशस्वी रित्या पार पडली. यांनी वर्षातली सगळ्यात मोठी फाईट नाईट करून पुन्हा आपल्या यशाची झलक दाखवली आहे. 

Updated: Apr 3, 2023, 10:47 PM IST
मैट्रिक्स फाइट नाइटच्या 11व्या आवृत्तीसाठी आयशा आणि कृष्णा श्रॉफ खूप खुश title=

मुंबई : आयेशा आणि कृष्णा यांनी पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात मॅट्रिक्स फाईट नाईट  ची 11 एडिशन ची यशस्वी रित्या पार पडली. यांनी वर्षातली सगळ्यात मोठी फाईट नाईट करून पुन्हा आपल्या यशाची झलक दाखवली आहे. मॅट्रिक्स फाईट नाईट  दिव्य भव्य तर होतीच पण संपूर्ण देशभरातील फायटर यात सहभागी होते आपल्या देशाचं प्रतनिधित्व करताना प्रत्येक फायटर उत्तम खेळत होता. फाईटचा उत्कंठावर्धक आणि तितकाच तणावाचा माहोल ऑनलाईन पहायला मिळाला. भारतातल्या MMA ला उत्तर देताना यांचा पुढच्या इव्हेंट आधीच एक वेगळा माहोल सोशल मीडिया वर तयार झाला आहे असं सुद्धा समजतंय. 

आयेशा श्रॉफ हिने या बद्दल बोलताना सांगितलं की, "ही भावना खूप जास्त कमालीची आहे. मॅट्रिक्स फाईट नाईटची क्रेझ अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण फाईट नाईट ची रात्र मला माझ्या सीटवर रोखून ठेवलं. मला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या यशस्वी पूर्ण प्रमोशन चे साक्षीदार आहोत आणि पुढच्या एडिशन साठी आम्ही उत्सुक आहोत " 

खूप उत्सुकतेने कृष्णा श्रॉफ म्हणाली " फाईट विकच्या पहिल्या आठवड्यापासून आम्हाला माहीत होत आमचा शो सुपर हीट आणि यशस्वी होणार आहे. संपूर्ण देश या आम्हाला या सगळ्यात मोठ्या फाईट नाईट मध्ये सहभागी झाला याचा आम्हाला आनंद आहे. फायटरने त्यांची खेळी उत्तम केली आणि प्रेक्षकांनी आम्ही भरभरून प्रेम दिलं याचा आम्हाला खूप आनंद आहे. 

MMA मॅट्रिक्स नावाप्रमाणे वन स्टॉप फिटनेस स्टुडिओ आहे जो अत्याधुनिक सुविधा देतो जिकडे MMA फिटनेस आणि आरोग्याच्या खास सुविधा देणार आहे. MMA मॅट्रिक्स च्या कोर टीम मध्ये टायगर श्रॉफ , कृष्णा श्रॉफ आयेशा श्रॉफ आणि कोच अलान फेनाडिस आहेत. MMA मॅट्रिक्स  यांनी अत्याधुनिक आणि टेक्निकली , फिजिकली स्किल्स च्या ट्रेनर ना यात समाविष्ट केला आहे जे उत्तम ट्रेनिंग देऊ शकतात.MMA मॅट्रिक्स  उत्तम सुविधांनी समाविष्ट असलेलं हे एक स्व रक्षणाचं आणि भरपूर सुविधांनी समाविष्ट असलेलं फिटनेस सेंटर आहे. 

 मॅट्रिक्स फाईट नाईट ही भारतातली प्रेमियर आणि उत्तम प्रकारची फाईट नाईट प्रमोशन आहे जिकडे जगभरातील फायटर त्यांची कौशल्य दाखवू शकतात. फायटर ला त्यांची कौशल्य आणि स्किल्स दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. MFN च्या आता पर्यंत 10 यशस्वी फाईट नाईट आवृत्त्या आल्या आहेत.