'इतक्या' कोटींसाठी Ayan Mukerji ला मिळाली 'War 2' ची ऑफर... Karan Johar चा पापड मोडला?

Ayan Mukerji Karan Johar War 2: अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली परंतु समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अयानला 'वॉर 2' (War 2) या चित्रपटाची ऑफर आली आहे आणि यासाठी त्याला तगडं मानधनही (Ayan Mukerji War 2 Fees) मिळणार असल्याचे कळते आहे परंतु यामुळे करण जोहरचा (Karan Johar Disappointed) पापड मोडला असल्याचे कळते आहे. 

Updated: Apr 16, 2023, 12:14 PM IST
'इतक्या' कोटींसाठी Ayan Mukerji ला मिळाली 'War 2' ची ऑफर... Karan Johar चा पापड मोडला?  title=

Ayan Mukerji Karan Johar: अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटानं गेल्या वर्षी बॉक्स (Brahmasatra Next Parts) ऑफिसवर तूफान कमाई केली. आता या चित्रपटाचे पुढील दोन मोठे भागही प्रदर्शित होणार आहेत ज्याची नुकतीच अयाननं जाहीर घोषणा केली आहे. अयान आता वॉर 2 या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार असल्याची बातमी समोर आली असून यासाठी त्याला तगडी ऑफर मिळाल्याचेही कळते आहे. यापुर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) करणार होते परंतु आता या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असल्याचं कळतं आहे. वॉर या चित्रपटाच्या पहिला भाग हा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ प्रमुख भुमिकेत दिसले होते. 

या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिली आहे. रिपोर्ट्सनुसार, अयान मुखर्जीला 'वॉर 2' (Ayan Mukerji War 2) या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी 32 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आल्याचे समजते आहे. 'वॉर' या 2019 साली प्रदर्शित झालेल्या (Ayan Mukerji Offered 32 Crores) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 400 कोटींच्या पार पोहोचले होते. जगभरात या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा पुढील भागही प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. (ayan mukerji offered 32 crores for war 2 film direction karan johar gets upset here is the reason report said)

करण जोहर नाराज? 

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे पॉडक्शन हे करण जोहर याच्याकडे आहे. त्यामुळे सध्या अयान हा 'ब्रह्मास्त्र' या पुढील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात व्यग्र असताना 'वॉर 2' चे दिग्दर्शन करण्याचे का स्विकारले म्हणून करण जोहरचा पापड मोडला आहे. असे कळून येते की 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या पुढील दोन महत्त्वाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन मध्येच सोडून 'वॉर 2' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याने करण जोहर (Karan Johar Disappointed) नाराज होऊन बसला आहे. 

हेही वाचा - मुलीच्या मेकअपवरून पत्नी माही ट्रोल! टीकेला उत्तर देताना Jay Bhanushali म्हणाला की...

अयान मुखर्जीनं साइन केलं कॉन्ट्रॅक्ट? 

'वॉर 2' (War 2 Budget) हा चित्रपट 2024-2025 च्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. 'वॉर'चा पहिला भाग हा सिद्धार्थ आनंद यांचा होता. त्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. तेव्हा आता अयान मुखर्जीसमोरही नवं आव्हान उभं आहे. हा चित्रपट 'यशराज फिल्म्स'च्या प्रोडक्शनचा आहे. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, करण जोहरची अशी इच्छा होती की आधी अयाननं 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांचे दिग्दर्शन पुर्ण करून नंतर 'वॉर 2' च्या दिग्दर्शनाकडे लक्ष द्यायला हवे होते. कॉन्ट्रॅक्टनुसार करण जोहरचा चित्रपट आधी पुर्ण करणं अपेक्षित होते. करण जोहरनं यासाठी 100 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याचे कळते आहे.