Confirm! सुनिल शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; लेकीच्या लग्नाची तारीख समोर

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूल लवकरच अडणकणार विवाहबंधनात; लग्नाची तयारी सुरु, 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात  

Updated: Dec 13, 2022, 11:13 AM IST
Confirm! सुनिल शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; लेकीच्या लग्नाची तारीख समोर  title=

Athiya Shetty - KL Rahul Marriage : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक प्रसिद्ध सलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लग्नबंधनात अडकणार आहेत. राहुल आणि अथिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हापासून चाहते दोघांना कायम लग्न कधी करणार? हाच प्रश्न विचारत होते. आता अथिया - राहुलच्या लग्नासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. (kl rahul marriage date)

दरम्यान, अथियाचे वडील आणि अभिनेता सुनिल शेट्टीला लेकीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा 'लवकरच दोघांचं लग्न होईल...' असं उत्तर अभिनेत्याने दिलं. सुनिलच्या  वक्तव्यानंतर अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल (kl rahul wife) पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. (athiya shetty and kl rahul love story)

केएल राहुल - अथियाच्या लग्नाचे विधी 21 ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत पार पडणार आहेत. बी टाऊनमधील या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत. एवढंच नाही, तर डिसेंबरच्या शेवटपर्यंत अथिया आणि राहुल त्यांच्या नातेवाईकांना लग्न पत्रिका पाठवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (athiya shetty marriage)

वाचा | डोळे मिटल्यानंतरच Smita Patil यांची इच्छा पूर्ण; त्याने थरथरत्याने हाताने मेकअप केला आणि... 

 

अथिया आणि राहुलच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण अद्याप अथिया - राहुल (athiya shetty husband) आणि त्यांच्या कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यामधील सत्य येत्या काळातच समोर येईल. (kl rahul marriage photos)

अथियाच्या (athiya shetty age) कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. याशिवाय अथियाने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिका साकारली.