मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तब्बेत आता अतिशय चिंताजनक आहे. एम्समध्ये बुधवारी त्यांनी वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते मंडळी त्यांना भेटायसा एम्समध्य गेले आहेत. वाजपेयी यांच वय आता 94 वर्ष आहे. उत्तम नेता म्हणून वाजपेयी लोकप्रिय आहेतच पण ते उत्तम साहित्यकार आणि पत्रकार देखील आहेत. त्यांच्या अनेक रचना आजही लोकप्रिय आहेत.
एवढंच काय तर वाजपेयी यांच्या काही कविता बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये आपण ऐकल्या आहेत. त्यांची 'क्या खोया क्या पाया जग में' ही कविता अतिशय लोकप्रिय आहे. त्यांच्या या कवितेवर 1999 मध्ये अभिनेता शाहरूख खानचा सिनेमा चित्रीत केला होता. 'क्या खोया क्या पाया जग में' ही कविता लोकप्रिय गायक जगजीत सिंह यांनी आपल्या आवाजात गायलं आहे. 'क्या खोया क्या पाया जग में' या कवितेचा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय आहे. या व्हिडिओच्या सुरूवातीला वाजपेयी यांना दाखवल आहे. या व्हिडिओत पुढे अनेक ठिकाणी शाहरूख खान आणि अटल बिहारी वाजपेयी यांना एकत्र फोटो दाखवले आहेत. हा व्हिडिओ सारेगामा गजल या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
या अल्बमचं नाव आहे 'संवेदना' असं आहे. ता पुन्हा एकदा त्या अल्बमची आठवण झाली.