Ashton kutcher And Mila kunis will not leave property for their childrens : प्रत्येक आई-वडील हे त्यांच्या मुलांसाठी खूप काही करून ठेवतात. त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतात. इतकंच काय तर त्यांची संपूर्ण संपत्ती ही मुलांच्या नावावर करतात. दरम्यान, याचा उलटं झाल्याचं सध्या समोर आलं आहे. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल पण असं होणार आहे. अमेरिकन अभिनेता अॅश्टन कुचर (ashton kutcher) आणि त्याची पत्नी मिला कुनिस (mila kunis) यांना दोन मुलं आहेत. तर त्या दोघांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या मुलांसाठी एकही पैसा सोडणार नसल्याचं म्हटलं आहे.
अॅश्टन कुचर आणि मिला कुनिस या दोघांनी डॅक्स शेपर्ड पॉडकास्टसह आर्मचेअर एक्सपर्टच्या एका एपिसोडवर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी खुलासा केला की ते दोघं त्यांच्या मुलांसाठी कोणतीही संपत्ती ठेवणार नाही आहेत. माझ्या मुलांना खरंच खास आयुष्य मिळालं आहे आणि त्यांना त्याची जाणीव नाही. मी त्यांच्यासाठी कोणती ट्रस्ट नाही करत आहे. शेवटी आम्ही आमचे सगळे पैसे दान आणि इतर गोष्टींमध्ये खर्च करू. अॅश्टन कुचर आणि मिला कुनिस या दोघांचे चांगले बॅकग्राऊंड होते आणि इंडस्ट्रीत त्यांनी खूप काम केलं आहे.
आता त्यांच्या प्रॉपर्टी विषयी बोलायचे झाले तर अॅश्टन कुचर आणि मिला कुनिस या दोघांकडे 275 मिलियन म्हणजेच जवळपास 22,599,678,750 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. इतकी प्रॉपर्टी असताना त्या दोघांनी मुलांसाठी काहीही न ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.
I get the instinct to be repelled by ostentatious displays of wealth but there is really absolutely nothing admirable about refusing to let your children reap the fruits of your labor sorry. If not for your children then for who https://t.co/H85us0k48d
— isa (@butch__queen) March 30, 2023
they saw how you’ve been cooking nepo babies on here https://t.co/fjnonblQbV
— Hurt CoPain (@SaeedDiCaprio) March 30, 2023
Imagine being lucky enough to be born into wealth and your parents tell you “WE’RE rich, not you.” lmao https://t.co/kU5NeCaDoZ
— From “spicy Becky” to “mulatto lame” (@HarlemMC) March 30, 2023
हेही वाचा : Samir Choughule ने शेअर केला 25 वर्षं जुना फोटो, म्हणाला...
अॅश्टन कुचर आणि मिला कुनिस या दोघांना त्यांच्या या निर्णयामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. काही नेटकऱ्यांनी त्या दोघांना मुलांना पैशाचे मुल्य शिकवण्यासाठी असे करण्यापेक्षा त्यांना ती गोष्ट शिकवण्यास सांगितलं आहे. काही नेटकऱ्यांनी आई-वडिलांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या मुलांना कळला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल असं म्हटलं आहे. तर डॅक्स शेपर्ड पॉडकास्टसह आर्मचेअर एक्सपर्टमध्ये पुढे अॅश्टन कुचर म्हणाला, जर पुढे जाणून त्यांच्या मुलांनी जर बिझनेस करण्याचा निर्णय घेतला तर ते त्यांना फंड देतील. दरम्यान, कोरोना दरम्यान, नॉर्किंग पॉइंट वाइनसोबत मिळून दान करण्यासाठी त्यांना मद्य पानाचा बिझनेस केला होता.