आशा पारेख होत्या 'या' दिग्दर्शकाच्या प्रेमात, राहिल्या अविवाहित

का केलं नाही लग्न 

आशा पारेख होत्या 'या' दिग्दर्शकाच्या प्रेमात, राहिल्या अविवाहित  title=

मुंबई : एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री आशा पारेखने आपल्या जिद्दीवर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी आशा पारेख यांचा जन्म. आशा पारेख आज 76 वर्षांच्या आहेत. एक अशी वेळ होती की, आशा पारेख यांचे अनेक चाहते आणि दिवाने होते. मात्र अशावेळी आशा पारेख या देखील एका व्यक्तीच्या खूप प्रेमात पडल्या. पण असं काय झालं की त्यांनी लग्न केलं नाही आणि आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. 

आशा पारेख यांच म्हणणं होतं की, तिच्या नशिबात लग्न नाही. ती एकटी आहे की ती खूष आहे. आशा पारेख अशा अभिनेत्री आहेत ज्यांच्या उंचीपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. बहुदा यामुळे त्यांचा कधीही कुणी लग्नाचा विचार केला नाही. आशा पारेख यांच नाव आमीर खानचे काका आणि दिग्दर्शक असलेल्या नासिर हुसैन यांच्या नावासोबत हे जोडले आहे. मात्र एका मुलाखतीत आशा पारेखने एक खुलासा केला आहे की, त्यांच एका बॉयफ्रेंडसोबत अफेअर होतं. हा बॉयफ्रेंड कुणी दुसरं तिसरं नसून ते दिग्दर्शक नासिर हुसैन आहेत. 

नासिर हुसैन यांच्यासोबत लग्न न झाल्यामुळे आशा पारेख यांनी एका मुलाखतीत एक खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मला नासिर हुसैन यांना मला माझ्या कुटुंबापासून दूर करायचं नव्हतं. म्हणून मी कधीच लग्न केलं नाही.