आमिर खान पुन्हा प्रेमात? फोटो पाहून चाहत्यांना धक्का

आमिर खानची मुलगी आयरा खानने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला

Updated: May 14, 2022, 09:39 PM IST
आमिर खान पुन्हा प्रेमात? फोटो पाहून चाहत्यांना धक्का title=

मुंबई : आमिर खानची मुलगी आयरा खानने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला आणि या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने मुलगी इरा खानचा वाढदिवस साजरा केला. केकवरील मेणबत्त्या विझवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून ट्रोल करणाऱ्यांचे डोळे विस्फारले आणि संधी न दवडता त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

पूल पार्टी असल्याने  या फोटोत आमिरही शर्टलेस दिसत आहे, तर मुलगा आझादही त्याच्यासोबत दिसत आहे. तर आयरा बिकीनी लूकमध्ये आहे. पण आता आयरा खानने नुकतेच पुन्हा एकदा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे फोटो शेअर केल्यानंतर चर्चा आहे आमिर खानची. आता तुम्ही म्हणाल त्याने काय केलं? 

गेल्यावर्षी अमिरने किरण रावसोबत घटस्फोटो घेतला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या घटस्फोटोमागचं कारण फातिमा शेख असल्याचं बोललं जात होतं. फातिमाही त्यावेळेस बरीच ट्रोल झाली होती. आणि पुन्हा एकदा आयराच्या बर्थडे पार्टीला फातिमा अमिरच्या कुटूंबींयासोबत दिसली. हा फोटो समोर येताच पुन्हा एकदा आमिर आणि फातिमाच्या नात्यावर चाहते बोट दाखवत आहेत.  त्यामुळे आता आमिर आणि फातिमाच्या नात्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असल्याचं दिसून येतयं. हे फोटो आयराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. मात्र या केवळ चर्चा आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आयरा खान स्टार किड असून अद्याप तिनं चित्रपटांमध्ये प्रवेश केलेला नाही, मात्र तरीही ती खूप प्रसिद्ध आहे. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आयराने सोशल मीडियावर तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. आयरा मानसिक आरोग्याबाबतही खूप जागरुक आहे आणि प्रत्येक वेळी ती या विषयावर खुलेपणाने बोलते.