मुंबई : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह मुंबईच्या विशेष न्यायालयाने आज पुन्हा एकदा आर्यन खानची जामीन याचिका फेटाळली आहे. आर्यन खान आणि इतर 7 जणांना 3 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खान हा 17 दिवसांपासून तुरूंगात आहे.
विशेष मुंबई न्यायालयाने गेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खानच्या जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला होता. Cordelia क्रूझ जहाजावर छापे टाकून आर्यन खान, अरबाज मर्चंटसह 7 जणांना एनसीबीने अटक केली आहे.
विशेष कोर्टाने आज देखील आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीला पुढे ढकलली आहे. तर क्रूझ रेव्ह पार्टी आयोजकांसारख्या इतर काही जामीन याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होईल.
न्यायालय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीसाठी 4 नोव्हेंबरला सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे जर आर्यन खानला त्या आधी जामीन मिळाला नाही, तर त्याला दिर्घकाळासाठी तुरुंगात राहावे लागेल.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन याचिका फेटाळल्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, वानखेडे यांनी ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत स्वाक्षरी केली.
विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकीलाने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, आर्यन खानच्या वकिलांनी यासंदर्भात हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. आता हायकोर्ट यावर काय सुनावणी देईल? किंवा आज यासंदर्भात सुनावणी होणार की नाही याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे.