ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा; एनसीबीकडून क्लिनचीट

गेल्यावर्षी आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती

Updated: May 27, 2022, 02:05 PM IST
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा; एनसीबीकडून क्लिनचीट title=

मुंबई : गेल्यावर्षी आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. जवळपास  २५ दिवस  कोठडीत राहिल्यानंतर त्याला जामिन मिळाला होता. मात्र त्याच्यावर खटला न्यायलयात सुरु होता. यानंतर सतत या प्रकरणाची कसून चौकशी सुरु होती.  NCB ने ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र सादर केलं आहे. या प्रकरणाचा एक भाग म्हणून एनसीबीने मुंबई  सत्र न्यायालयात आज आरोपपत्र सादर केलं.  जवळपास एकूण १० खंडांचं आणि 6000 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे.

 या प्रकरणात विशेष एनसीबी एसआयटी प्रकरणाच तपास करत होते. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुद्दत वाढवून दिली होती. एनसीबी एसआयटी तर्फे ९० दिवसांची मुद्दत वाढवून देण्याची मागणी  करण्यात आली होती.

 २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबी ने ड्रग पार्टीवर धाड टाकत  कारवाई केली होती. ड्रग प्रकरणात एकूण 20 लोकांवर कारवाई करण्यात आली होती. एनसीबीने 20 आरोपींना अटक केलं होतं. 14 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल तर उर्वरित 6 जणांवर पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही.