Arun Govil: ''आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही सिगारेट...?'', अरूण गोविल यांना फॅननं सुनावलेले खडे बोल

Arun Govil Cigarette: 'रामायण' या मालिकेनं अल्पावधीच मोठी लोकप्रियता मिळवली होती. अरूण गोविल (Arun Govil News) यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आले होते. परंतु त्यांच्यासोबत घडलेल्या एका किस्स्यानंतर त्यांनी सिगारेटला हातही लावला नव्हता तेव्हा पाहूया (Arun Govil as ram) की नक्की हा किस्सा काय होता. 

Updated: Apr 7, 2023, 12:46 PM IST
Arun Govil: ''आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही सिगारेट...?'', अरूण गोविल यांना फॅननं सुनावलेले खडे बोल title=

Arun Govil Cigarette: रामायण या मालिकेनं (Ramayan Serial) एकेकाळी भारतीय प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. या मालिकेनं आपल्याला आयुष्यातील धडे शिकवले. ही मालिका आजही घराघरात आनंदानं पाहिली जाते. सोबतच त्यांना या मालिकेतील पात्रंही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. लॉकडाऊनच्या (Ramayan in Lockdown) काळात ही मालिकाही आवडीनं पाहिली गेली. जेव्हा ही मालिका पहिल्यांदा 80 च्या दशकात टेलिकास्ट झाली तेव्हा ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आपापली कामं आटपून संध्याकाळी ही मालिका पाहण्यासाठी घरी धावायचे त्यामुळे तेव्हा अक्षरक्ष: रस्ते ओस पडायचे. या मालिकेची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. या मालिकेतील रामाची भुमिका साकारणाऱ्या अरूण गोविल (Arun Govil Fan) यांच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. 

मालिका असो वा चित्रपटाची सेट, चित्रिकरणाच्या वेळी अनेक किस्सेही गाजत असतात. रामायण या मालिकेच्या चित्रिकरणाचे अनेक किस्से आहेत. सध्या असाच एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किस्सा अरूण गोविल यांच्यासोबत घडला होता. अरूण गोविल यांची भुमिका (Arun Govil as Ram) त्याकाळी इतकी गाजली की त्यांना प्रेक्षक हे अक्षरक्ष: देव मानायचे. त्यांच्या लोकप्रियतेत तेव्हा विलक्षण वाढ झाली होती. त्यांची लोकं अक्षरक्ष: पूजा करायचे. रामायण या मालिकेच्या कलाकारांनी कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोला हजेरी लावली होती.

फॅननं खडेबोल सुनावलं? 

तेव्हा त्यांनी असाच एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, एकदा एका चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी त्यांनी सिगारेट ओढली होती परंतु हे पाहून एका फॅननं त्यांना खडेबोल सुनावलं होतं. त्यावेळी अरूण गोविल यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालेली होती. त्यामुळे रामाच्या भुमिकेतचं त्यांना लोकं पाहू लागले होते. त्यांची प्रतिमाही भगवान राम (Lord Ram) म्हणूनच ओळखली जाऊ लागली तेव्हा चित्रिकरणाच्या वेळी एका फॅननं त्यांना असं सिगारेट ओढताना पाहणं धक्कादायक होतं. 

काय घडला किस्सा? 

तामिळ चित्रपट 'बाइलिंगुअल' या चित्रपटाच्या दरम्यानचा हा किस्सा आहे. यावेळी या चित्रपटात तिरूपति बालाजी यांचा भुमिका अरूण गोविल करत होते. अरूण गोविल यांनी सांगितले होते की, त्यावेळी मला वेळ मिळेल तेव्हा मी सिगारेट ओढायचो. तेव्हा चित्रिकरणाच्या वेळी लंच ब्रेकच्या वेळी ते असेच सिगारेट पित होते. तेव्हा अचानक एका व्यक्तीनं त्यांना पाहिले आणि त्यांना पाहून ते काही बाही बोलायला लागले. तेव्हा अरूण गोविल यांना नक्की कळलंच नाही की काय प्रकार घडला, तेव्हा एका व्यक्तीकडून कळलं की तो फॅन अरूण गोविल यांच्यावर रागावर होता. तो म्हणाला होता की आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही सिगारेट पिता. तेव्हा यानंतर त्यांनी सिगारेटला अजिबातच हात लावला नाही.