घटस्फोटानंतर अर्जुन रामपाल लिव्ह-इनमध्ये, वाढदिवसाला गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिली शानदार पार्टी

Arjun Rampal: मेहरसोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्यांमध्येच अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्सला डेट करत आहे.

Updated: Nov 30, 2022, 06:00 PM IST
घटस्फोटानंतर अर्जुन रामपाल लिव्ह-इनमध्ये, वाढदिवसाला गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिली शानदार पार्टी title=

Arjun Rampal - Gabriella Demetriades : अर्जून रामपाल आणि मेहर जेसिया यांनी आपल्या 20 वर्षाच्या लग्नाच्या नात्याला पूर्णविराम देऊन घटस्फोट घेतला होता. यानंतर अर्जूनच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाली. एवढंच नाही तर अर्जून हिच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. अर्जून आता Gabriella Demetriades नावाच्या मुलीला डेट करत आहे. 

सोशल मीडियावर या दोघांनी आपले फोटो शेअर केले आहे. अर्जून Gabriella सोबत यूरोपमध्ये क्वालिटी टाईम स्पेंण्ड करत आहे.  Gabriella ही लोकप्रिय साऊथ आफ्रीकन मॉडेल आहे. ती मिस आयपीएल बॉलिवूड 2009 मध्ये स्पर्धक असून डेक्कन चार्जर्सची रिप्रेझेंट राहिली आहे.

अर्जुन रामपाल 50 वर्षांचा झाला आहे. त्याच्या 50 व्या वाढदिवशी त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटोही गॅब्रिएलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

अर्जुन रामपालच्या वाढदिवसानिमित्त गॅब्रिएलाने मुंबईच्या समुद्रात एका प्रायव्हेट  याटवर पार्टी दिली. अर्जुन आणि गॅब्रिएलाचे जवळचे मित्र या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत आलेल्या गेस्टने खूप धमाल केली. अर्जुन आणि गॅब्रिएलाही पाहुण्यांसोबत डान्स करताना दिसले. अर्जुन रामपाल पत्नी मेहरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये राहत आहे. गॅब्रिएला अर्जुन कपूरच्या मुलाचीही आई झाली आहे. जरी दोघांनी अद्याप लग्न केले नाही.

मेहरसोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्यांमध्येच अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल (Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades) गॅब्रिएला डेमेट्रेड्सच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली, या मुलाचं नाव एरिक आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅब्रिएला आणि अर्जुनचं लग्न झालेले नाही.