लग्नाच्या २० वर्षांनंतर अर्जुन रामपाल आणि मेहरमध्ये घटस्फोट

 दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: May 28, 2018, 12:51 PM IST
लग्नाच्या २० वर्षांनंतर अर्जुन रामपाल आणि मेहरमध्ये घटस्फोट  title=

मुंबई : अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचा बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत होत्या.  पण आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोघांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला आता वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज असल्याचे बॉम्बे टाईम्सला दिलेला मुलाखतीत त्यांनी सांगितले. अर्जुन आणि मेहरला यांना माहिका (१६) आणि मार्या (१३) या दोन मुली आहेत. यानंतर बॉम्बे टाइम्सतर्फे विचारलेल्या प्रश्नांना त्या दोघांकडून टाळण्यात आले. नात संपू शकत पण प्रेम जिवंत राहत असं या दोघांनी सांगितल. दोघांच्या वेगळं होण्याची बातमी त्यांच्या फॅन्ससाठी निराशाजनक नक्कीच आहे.'आम्ही एक परिवार आहोत आणि आमच्या मुलींच्यामागे नेहमी उभे राहू. आम्ही एकमेकांच्या प्रायवसीचा आदर करतो.याव्यतिरिक्त आम्हाला काही बोलायच नसल्याच दोघांनी यावेळी सांगितल.

सुझैनमुळे घटस्फोट ?

अर्जुन आणि मेहर आता एकत्र राहत नाहीत. सुझैन, अर्जुन आणि मेहर याआधी खूप चांगले मित्र होते. पण वेळेसोबतच सुझैन आणि अर्जुनमध्ये जवळीक वाढत गेली आणि मेहरच्या नात्यात वितुष्ट आलं. ऋतिक आणि सुझैनच्या घटस्फोटासही हेच कारण असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. 'स्पॉटबॉय' मध्ये आलेल्या वृत्तानुसार, अर्जुन घर सोडून गेला असून सध्या एकटा राहतोय. गेल्या वर्षभरात त्याच्या घटस्फोटाची चर्चा  अधिक जोर धरत होती.

मेहर जेसियाविषयी...

मेहर जेसिया भारताच्या सुपर मॉडेल खिताब मिळविणाऱ्यांपैकी एक आहे. याशिवाय तिला सर्वजण यशस्वी मॉडेल आणि अर्जुनची पत्नी म्हणून जास्त ओळखतात. फेमिना मिस इंडिया बनल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली होती. करियरच्या उभारीतच तिला आंतरराष्ट्रीय मेकअपर ब्रॅण्ड लॅनकमचा चेहरा बनण्याची संधी मिळाली. त्यावेळी इसाबेला रॉसेलिनी हा चेहरा होती. पण आपल्या घराला प्राधान्य देत ही ऑफर नाकारली.  त्यानंतर काही वर्षांनी मॉडेलिंग सोडून संसारात बिझी झाली. अर्जुनसोबतच्या लग्नाला आता १९ वर्षे झाली असून त्यांना २ मुली आहेत. सध्या ती अनेक फॅशन शो कोरियोग्राफ करते तसेच पतीच्या बिझनेसमध्येही हातभार लावते. अर्जुन रामपालचे दिल्ली आणि मुंबईत फाइव्ह स्टार रेस्टोरंट आहेत.