सुनीधी चौहानकडून पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर

 सुनिधि चौहानने पहिल्यांदाच आपल्या ४ महिन्याच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला.

Updated: May 28, 2018, 01:12 PM IST
 सुनीधी चौहानकडून पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर  title=

मुंबई : आपल्या गायकिने सर्वांच मनं जिंकणाऱ्या सिंगर सुनिधी चौहानने पहिल्यांदाच आपल्या ४ महिन्याच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला. सुनिधीने यावर्षी १ जानेवारीला मुलाला जन्म दिला.२०१२ साली तिने हितेश सोनिकसोबत लग्न केलं. आतापर्यंत तिच्या बाळाचा फोटो समोर आला नव्हता. रविवारी तिने इन्स्टाग्रामवर आपल्या बाळाचा फोटो शेयर केलाय. यामध्ये तिने आपल्या बाळाला उचलून घेतलंय. सुनिधी ब्लॅक अॅण्ड व्हाइट आऊटफिटमध्ये दिसतेय.

प्रेग्नेंसीतही अॅक्टिव्ह 

 

Ready for my first gig as a Mom!

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on

प्रेग्नेंसी दरम्यानही सुनिधी सगळीकडे अॅक्टीव्ह होती. त्यावेळी तिने 'अमेझॉन प्राइम रिअॅलिटी शो- द रिमिक्स' जज केला होता. हा शो खूपच चर्चेत राहिला. आई झाल्यानंतरचा अनुभव तिने शेअर केला. 'मी खूप एक्साइटेड आहे, असा अनुभव मी पहिल्यांदाच घेतेय. देवाचे खूप आभार मानते. हा जगातली सर्वात जादुई क्षण असल्याचेही' तिने सांगितले. तिने खूप सारे सिंगिग रिअॅलिटी शो केले आहेत. पण टीव्ही अॅक्टर तब्बसुमने सुनिधी मधली कला पारखली आणि तिच्या आई वडिलांना मुंबईला यायला सांगितल.  त्यानंतर सुनिधीने दूरदर्शनवर 'मेरी आवाज सुनो' मध्ये भाग घेत खिताब जिंकला.  तिने‘शीला की जवानी’,  ‘इश्क सूफियाना’, ‘बीड़ी जलाइ ले’, ‘देसी गर्ल’, ‘कमली’, ‘भागे रे मन’सारखी सुपरहिट गाणी दिली.