अर्जुन कपूरच्या बहिणीने असं काय केलं? की तिची थेट मलायका अरोरासोबत होतेय तुलना

ही चर्चा तिच्या एका सेल्फीवरून सुरु झाली आहे.

Updated: Feb 25, 2022, 08:54 PM IST
अर्जुन कपूरच्या बहिणीने असं काय केलं? की तिची थेट मलायका अरोरासोबत होतेय तुलना title=

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरच्या जवळपास सर्व बहिणींनी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं आहे आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याची सख्खी बहीण अंशुला कपूर देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे.

ही चर्चा तिच्या एका सेल्फीवरून सुरु झाली आहे. एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल होणारी अंशुला आता स्लिम ट्रिम झाली आहे आणि ती आपल्या सौंदर्याने बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना चांगलीच टक्कर देत आहे. 

तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना आश्चर्यचकीत करणार आहे. आता तिची तुलना थेट मलायका अरोरासोबत केली जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंशुलाकडून वजन कमी 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये अंशुला पूर्वीपेक्षा खूपच वेगळी दिसत आहे. तिनं आपल्या ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.