मलायकाच्या प्रेमात Arjun Kapoor वेडा, जे केलं पाहून सगळेच हैरान

आता अर्जुन बोलणार, "मेरे सामनेवाली खिडकी मैं मलायका अरोरा रहती है"

Updated: Dec 20, 2021, 06:17 PM IST
 मलायकाच्या प्रेमात Arjun Kapoor वेडा, जे केलं पाहून सगळेच हैरान title=

मुंबई : 'इशकजादे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सर्वात जास्त त्याची चर्चा होते, जेव्हा तो मलायका अरोरासोबत दिसून येतो. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. सेलिब्रेटी त्यांच्या चित्रपट आणि लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात.

अर्जुनच्या पदार्पणाला जवळपास 9 वर्षे झाली आहेत, पण यादरम्यान त्याने अनेक मोठे चित्रपट केले. त्यात आता अर्जुन कपूर एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच्या नवीन घरामुळे तो सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. अर्जुनने नवीन घर विकत घेतले आहे.

Malaika Arora reveals son Arhaan's reaction to her relationship with Arjun  Kapoor - Movies News

लेडी लव्ह मलायका अरोराच्या घराजवळच त्याने हे घर घेतले आहे आणि अशा प्रकारे अर्जुन मलायकाचा नवा शेजारी बनला आहे. अर्जुनने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातील स्काय व्हिला येथे आपला नवीन आलिशाना तयार केला आहे. सोबत त्यांच्यातील बॉडिंग आता दिवसेंदिवस घट्ट होताना पाहायला मिळत आहे.

लेडी लव मलाइका के घर के सामने अर्जुन कपूर ने खरीदा नया आलीशान बंगला

अर्जुनने नवं घर 25 व्या मजल्यावर आहे आणि त्यात 81 स्काय व्हिला आहेत. त्याचबरोबर घराची किंमत 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्याचा संदीप और पिंकी फरार, तसंच सरदार का ग्रैंडसन हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय अर्जुनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात एक व्हिलन 2 आणि भूत पुलिस यांचा समावेश आहे.